शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Terror Attack: लष्करी वाहनावर अतिरेकी हल्ला; ५ जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:43 IST

Terror Attack In Jammu Kashmir: अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात लष्करी वाहनावर हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पूंछ : अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात लष्करी वाहनावर हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

‘गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछदरम्यान जात असलेल्या लष्कराच्या ट्रकवर मुसळधार पाऊस आणि परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी ट्रकवर बॉम्ब टाकल्यामुळे आग लागली असावी, असे उत्तरी कमांडच्या मुख्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पाचही शहीद जवान राष्ट्रीय रायफल्सचे होते. घटना घडली ते ठिकाण पूंछपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. शहीद झालेले जवान राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. हल्ला ज्या ठिकाणी झाला, तेथे गेल्या वर्षी दहशतवाद्यांसोबत मोठी चकमक झाली होती. या ठिकाणी आजूबाजूला घनदाट जंगल आहे.

पीएएफएफने स्वीकारली जबाबदारी- पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहंमद’ या अतिरेकी संघटनेचे पाठबळ असलेल्या ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ (पीएएफएफ) या संघटनेने लष्करी वाहनावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. - या हल्ल्याबद्दल लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली आहे. हल्ला करणारे चार अतिरेकी होते आणि त्यांनी तीन बाजूंनी हल्ला केला होता, असे वृत्त आहे.दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या हल्ल्याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. वीज कोसळल्यामुळे वाहनाने पेट घेतल्याचा अंदाज सुरुवातीला होता. मात्र, घटनास्थळी लष्कराचे पथक पोहोचल्यानंतर हा दहशतवादी हल्ला असू शकतो, असा अंदाज वर्तविला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान