शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवेळी भयंकर घटना; जन्मदात्या बापाने आवळला मुलाचा गळा, धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 10:22 IST

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचा अखेरच्या सामन्यात पराभव झाल्याने संपूर्ण देश हळहळला. मात्र याच क्रिकेट सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना बघत असताना मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच त्याचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

रविवारी देशभरातील क्रिकेट चाहते भारतीय संघाच्या विजयाची प्रार्थना करत टीव्हीसमोर बसले होते. कानपूर येथील गणेश प्रसाद हेदेखील क्रिकेटप्रेमी असल्याने टीव्हीसमोर बसून सामन्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांचा मुलगा दीपक याने अचानक टीव्ही बंद केला. वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगात आलेला असतानाच मुलाने टीव्ही बंद केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी चक्क वायरच्या साहाय्याने गळा आवळून दीपकचा खून केला. याप्रकरणी आरोपी गणेश प्रसाद याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

कानपुरातील चकेरी येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने फोनद्वारे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासास सुरू केली. रविवारी रात्रीपासून दीपकचे वडील गणेश प्रसाद फरार असल्याचे पोलिसांना समजले. गणेश प्रसाद याला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे पिता-पुत्रामध्ये सतत वाद होत असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे या वादातूनच गणेशने मुलाचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. 

दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या गणेशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. मात्र व्यसनाच्या वादातून नव्हे तर वर्ल्ड कप फायनल सुरू असताना टीव्ही बंद केल्याचा राग आल्यानेच मी मुलाचा खून केल्याची कबुली गणेश प्रसाद याने दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कप