शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चीन-भारत सीमेवरील तणाव निवळला; अखेर चीनची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 07:29 IST

मुत्सद्देगिरीला आले यश : उभय देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचा परिणाम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र, दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम मंगळवारी पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले आहे. चिनी सैन्याने त्यांची वाहनेदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानेदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत.

लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबद्दलची माहिती दिली. चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यानंतर भारतानेही काही जवानांना माघारी बोलावले.

सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाºयांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये संवादाच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्यावर एकमत झाले. मात्र, यानंतर सोमवारी चीनने कोणतीही सकारात्मक पावले टाकली नाहीत. उलट युद्धाभ्यास सुरू करीत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पूर्व लडाखमधील गलवान भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्रीपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीनने सैन्य हटवल्याने भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जवानांना परतण्याचे आदेश दिले.माघार कशामुळे?जगभर फैलावलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनवर अमेरिकेसह सर्व जगभरातून टीका केली जात आहे. कोरोना व्हायरससाठी चीनला दोषी ठरवले जात आहे. त्यातच चीनने भारत सीमेवर जास्तीचे सैन्य तैनात केल्यामुळे जगभरात आणखी नाचक्की होईल, यामुळे चीनने त्यांचे सैन्य माघारी घेतले. या प्रकरणात भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेही चीनने नरमाईचे धोरण अवलंबले आहे, असे समजले जात आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत