शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:56 IST

भारतीय लष्कर हलके टँक 'जोरावर' चे उत्पादन देखील जवळजवळ पूर्ण झाले आहे, जे लडाख आणि सिक्कीम सारख्या उंचावरील प्रदेशांसाठी डिझाइन केले गेले आहे.

नवी दिल्ली - भारताची प्रमुख संरक्षण संशोधन संस्था DRDO (Defence Research and Devlopment Organisation) सातत्याने देशाच्या लष्करी सामर्थ्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी आधुनिक आणि प्रगत शस्त्र प्रणालींवर सतत काम करत आहे. यामध्ये हायपरसोनिक मिसाईल, हायएनर्जी लेजर, स्टेल्थ लढाऊ विमाने, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान आणि हवाई संरक्षण प्रणालींचा समावेश आहे. भारत पुढील पिढीतील अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्याच्या दिशेने वेगाने कशी वाटचाल करत आहे याबाबत डीआरडीओचे प्रमुख डॉ. समीर व्ही कामत यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.

सर्वात पहिली चर्चा होते की ब्रह्मोस-NG क्रूज मिसाईल, जी सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रह्मोसपेक्षा हलकी आणि छोटी असेल. विविध प्रकारच्या लढाऊ विमानांना ती सहजपणे लावता येईल. सध्या जी ब्रह्मोस आहे ती केवळ SU 30MKI सारख्या भारी लढाऊ विमानालाच फिट होऊ शकते. DRDO ब्रह्मोसमध्ये अपग्रेड करत त्याची रेंज वाढवून वजन कमी करण्यावर काम करत आहे जेणेकरून भारतीय हवाई दल आधुनिक रणनीतीने काम करू शकेल. 

२ हायपरसोनिक मिसाईलवर करतंय काम

याशिवाय दोन हायपरसोनिक मिसाईल सिस्टमवरही काम सुरू आहे. यापैकी एक हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) आहे जी त्याच्या चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील दोन ते तीन वर्षांत ती सैन्यात समाविष्ट केली जाऊ शकते. दुसरीकडे, स्क्रॅमजेट इंजिन तंत्रज्ञानात एक मोठी प्रगती झाली आहे, जी १००० सेकंद चालते. त्यातून हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनवण्याची तयारी सुरू आहे, ज्याला सरकारने मान्यता दिल्यास ५-७ वर्षांत तयार होऊ शकते.

एअर-टू-एअर मिसाइल

हवाई युद्ध क्षमता बळकट करण्यासाठी डीआरडीओ हवेतून हवेत मारा करणारी 'अस्त्र एमके-२ आणि एमके-३' क्षेपणास्त्रांवर काम करत आहे. त्याच वेळी 'रुद्रम-२', 'रुद्रम-३' आणि 'रुद्रम-४' या जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रे भारतीय सशस्त्र दलांना आणखी बळकटी देतील. ड्रोनसारख्या धोक्यांना तोंड देण्यासाठी DRDO एका डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टमवरही काम करत आहे, ज्यामध्ये लेजर आणि हायपॉवर माइक्रोव्हेव तंत्रज्ञान समाविष्ट असेल. भारताचे एअर डिफेन्स नेटवर्क मजबूत करण्यासाठी 'कुशा' नावाच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल प्रणालीचा विकास देखील वेगाने सुरू आहे. 

स्वदेशी स्टील्थ फायटर जेट

तसेच स्वदेशी स्टील्थ फायटर जेट, AMCA(अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट) देखील आता एका नवीन भागीदारी मॉडेल अंतर्गत विकसित केले जात आहे. या प्रकल्पात HAL सोबत खाजगी कंपन्यांचा सहभाग किंवा ज्वाईंट वेंचर होण्याची शक्यता आहे. यासाठी अलीकडेच एडीएने अलीकडेच EOI जारी केले आहे. भारतीय लष्कर हलके टँक 'जोरावर' चे उत्पादन देखील जवळजवळ पूर्ण झाले आहे, जे लडाख आणि सिक्कीम सारख्या उंचावरील प्रदेशांसाठी डिझाइन केले गेले आहे. त्याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि आता ते फील्ड ट्रायलसाठी पाठवले जाईल. आता डीआरडीओची रणनीती पूर्णपणे बदलली आहे. आमची सर्व शस्त्रे इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या ब्लॉक केलेल्या वातावरणात काम करावीत. यासाठी पूर्णपणे स्वायत्त प्रणाली विकसित कराव्या लागतील असं डॉ. कामत यांनी असेही स्पष्ट केले.  

टॅग्स :DRDOडीआरडीओIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानchinaचीन