शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सीमेवरही तणाव! बीएसएफने फायरिंग केल्याचा दावा; दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:02 IST

India-Bangladesh Border: मंगळवारी पहाटे बांगलादेश सीमेवर मोठी घडामोड घडली आहे. बीएसएफने फायरिंगही केल्याचा दावा स्थानिक करत आहेत. 

एकीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना आता बांगलादेश सीमेवरही दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले आहे. मंगळवारी पहाटे बांगलादेश सीमेवर मोठी घडामोड घडली आहे. बीएसएफने फायरिंगही केल्याचा दावा स्थानिक करत आहेत. 

बांगलादेश सीमेवरील बांगलादेशच्या कुरीग्राम आणि आसामच्या मनकाछार अशा दोन ठिकाणी सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेश बॉर्डर गार्ड समोरासमोर आले आहेत. बांगलादेशच्या कुरीग्राम जिल्ह्यातील रौमारी उपजिल्ह्यातील बोराईबारी सीमेवर बीएसएफने १४ लोकांना नो मॅन्स लँडमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. सीमेवरील स्तंभ १०६७ वर ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या लोकांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिला असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार बीएसएफने चार फैरीही झाडल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशच्या बीजीबीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांततेत हाताळल्याचे म्हटले आहे. 

या घटनेवर बीएसएफ गुवाहाटी फ्रंटियरच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.  २७ मे रोजी पहाटे, बीएसएफ जवानांना भारतीय हद्दीत घुसण्याच्या उद्देशाने बांगलादेशच्या बाजूने आंतरराष्ट्रीय सीमेकडे येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांना रोखण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

तर शांतता राखण्यासाठी बीजीबीने ध्वज बैठक बोलावण्याचा प्रस्ताव बीएसएफला दिला आहे. यावर अद्याप काही बीएसएफकडून प्रतिक्रिया आलेली नाही, असे बीजीबीच्या जमालपूर बटालियन-३५ चे सहाय्यक संचालक शमसुल हक यांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे आसामच्या मानकाचर सीमेवरही बीएसएफने गोळीबार केल्याचे वृत्त आहे. बीएसएफने शून्य रेषेवर चार राउंड झाडल्या. बीएसएफने इथेही घुसखोरी रोखली होती. यामुळे या भागातही परिस्थिती तणावपूर्ण आहे. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवान