शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

"२ वाजेपर्यंत ऑफीसमध्ये पोहोचा नाहीतर...", CM भगवंत मान यांची अधिकाऱ्यांना वॉर्निंग! नेमकं घडलं काय वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:51 IST

पंजाबमध्ये सरकारी अधिकारी आणि सरकारमधील तणाव आता दिवसेंदिवस वाढत आहे.

पंजाबमध्ये सरकारी अधिकारी आणि सरकारमधील तणाव आता दिवसेंदिवस वाढत आहे. सीएम भगवंत मान यांनी गैरपद्धतीनं सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱ्यांना लेखी वॉर्निंग दिली आहे. पाच दिवसांच्या रजेवर असलेल्या पीसीएस अधिकाऱ्यांना आणि रजेवर जाण्याच्या तयारीत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट वॉर्निंग दिली की, सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध झीरो टॉलरेन्सचं धोरण आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संपावर असलेल्या पंजाब सिव्हिल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनीही एक मेमो जारी केला आहे. सामुहिक रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना दुपारी २ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल. पंजाब सिव्हिल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य नियमांनुसार युनियन बनवण्याची आणि संपावर जाण्याची परवानगी नाही, असे या मेमोमध्ये थेट म्हटले आहे.

सरकारवर दबाव आणणं खपवून घेणार नाही- मुख्यमंत्री मानअधिकाऱ्यांनी जर कोणत्याही पद्धतीनं सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही. पंजाब सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांना अल्टीमेटम जारी करण्यात आलं आहे आणि ११ जानेवारी २०२३ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आली आहे. नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत केलं जाईल. 

सामूहिक रजेवर पीसीएस अधिकारीएका अधिकाऱ्याविरोधात नोंदवलेल्या गेलेल्या एफआयआर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात पंजाबच्या पीसीएस ऑफिसर्स असोसिएशनने पाच दिवसांच्या सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआर संदर्भात आयएएस अधिकारी रजेवर जाण्याच्या तयारीत आहे. पुरावे गोळा न करता व नियम धाब्यावर बसवून काही अधिकार्‍यांवर भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई केली जात असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मान