शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर तणाव ! पाकिस्तानला अद्दल घडवा, बीएसएफ प्रमुखांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 18:41 IST

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव सुरू आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव सुरू आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानकडून आतापर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत  होतं. परंतु आता आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवरही शस्त्रसंधीचा भंग केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय लष्करानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी त्यांचा प्रतिकार करा आणि त्यांना अद्दल घडवा, असं सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी आदेश दिले आहे. ते म्हणाले, सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून ब-याचदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल ए. सुरेशलाही हकनाक शहीद व्हावं लागलं आहे. सुरेशचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. सुरेशचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. बीएसएफचा कॉन्स्टेबल बंकरमध्ये असताना एक गोळी लागून तो शहीद झाला. यासारख्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही याला occupational hazards समजू शकता. आम्ही आमच्या लष्कराला बुलेटप्रूफ हेल्मेट आणि जॅकेट दिले आहेत. परंतु सर्वांगाचं रक्षण करण्यासाठी जॅकेट अपुरे पडत आहेत, असंही के. के. शर्मा म्हणाले आहेत. 

सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला मागच्या काही महिन्यात भारतीय लष्करानं अनेकदा चांगलीच अद्दल घडवली आहे. भारताच्या या धडक कारवाईचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. पाकिस्तानमध्ये आता डीजीएमओ स्तराच्या बैठकीवर विचारविनिमय सुरू आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारताला डीजीएमओ स्तराच्या बैठकीचे निमंत्रण देण्यावर पाकिस्तानात विचार सुरू आहे. 

पाकिस्तानी सिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार डीजीएमओ स्तराची बैठक घेण्यावर पाकिस्तान विचार करत आहे. पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत तरी डीजीएमओ स्तराच्या बैठकीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल असे इंडियन एक्सप्रेस दिल्लीतील सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान