दहा महसूल अधिकारी मनी लाँड्रिंगमध्ये दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:16 AM2019-11-16T05:16:27+5:302019-11-16T05:16:30+5:30

उत्तर कोलकातामधील एका घाणेरड्या ठिकाणांहून ९८ बनावट कंपन्या चालविणाऱ्या हिशेबनिसाचा पर्दाफाश झाल्याने खळबजनक माहिती उजेडात आली आहे.

Ten revenue officers guilty of money laundering | दहा महसूल अधिकारी मनी लाँड्रिंगमध्ये दोषी

दहा महसूल अधिकारी मनी लाँड्रिंगमध्ये दोषी

Next

नवी दिल्ली : उत्तर कोलकातामधील एका घाणेरड्या ठिकाणांहून ९८ बनावट कंपन्या चालविणाऱ्या हिशेबनिसाचा पर्दाफाश झाल्याने खळबजनक माहिती उजेडात आली आहे. भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) काही शक्तिशाली अधिकाऱ्यांना कथित दलाली मिळाल्याची जंत्रीच हाती लागली आहे. फारसा चर्चेत नसलेला अकाऊंटंट गोविंद अग्रवालच्या कार्यालयावर घालण्यात आलेल्या धाडीत हाती लागलेल्या आक्षेपार्ह दस्तावेजांनुसार हा प्रकार जैन हवाला डायरीइतकाच खळबळजनक असू शकतो.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीनुसार गोविंद अग्रवालची ठकबाजी आणि त्याच्या बनावट कंपन्यांशी संबंधित एकमेकांशी घनिष्ट असलेल्या नागरी सेवेतील अधिकाºयांच्या वर्तुळाशी भारतीय महसूल सेवेतील दहा अधिकाºयांचा थेट संबंध आहे. गोविंद अग्रवालच्या बनावट कंपन्यांत त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा असण्याची शक्यता असावी. या गोरखधंद्यात
सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांच्या यादीत माजी केंद्रीय दक्षता आयुक्त, सीबीडीटीचे सदस्य, माजी महासंचालकांचा समावेश
आहे.
ईडीने २३ आॅक्टोबर रोजी एक आयआरएस अधिकारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी कोलकात्यात काही ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या. आयआरएस अधिकारी नीरज सिंह यांच्याविरुद्ध चौकशीच्या अनुषंगाने एचएम दिवाण ज्वेलर्स आणि त्याच्या दोन प्रवर्तकांचे निवासस्थान, शोरूमवर आणि अन्य ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या धाडीत ईडीने सोन्याच्या अवैध विक्रीसह अनेक आक्षेपार्ह दस्तावेज आणि पंचतारांकित हॉटेल्सची बिले आदी जप्त केले होते.
गोविंद अग्रवालचे नागरी सेवेतील अधिकाºयांंशी जवळीक असल्याने त्याने कोलकाता येथील आंतरराष्टÑीय विमानतळावर परमिटचा वापर करून प्रतिबंधित भागात शंभरपेक्षा अधिक वेळा प्रवेश केला होता. त्यावेळी
नीरज सिंह हे हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त संचालक (चौकशी) होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Ten revenue officers guilty of money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.