शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

गुजरातमध्ये घुसखोरी करत होते 10 पाकिस्तानी, 300 कोटींच्या ड्रग्ज आणि शस्त्रांसह अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 20:43 IST

सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एटीएसने ड्रग्ज आणि शस्त्रांसह 10 पाकिस्तानींना अटक केली आहे.

अहमदाबाद : पाकिस्तानच्या घुसखोरांनी ड्रग्ज आणि शस्त्रे घेऊन सागरी सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील ओखा येथून ते देशाच्या सीमेत प्रवेश करत होते, मात्र कोस्टगार्ड आणि गुजरात एटीएसने त्याचा मनसुबा उधळून लावला. कोस्टगार्ड आणि एटीएसने 300 कोटी रुपयांच्या ड्रग्ज आणि शस्त्रांसह आरोपींना पकडले. सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एटीएसने ड्रग्ज आणि शस्त्रांसह 10 पाकिस्तानींना अटक केली आहे.

आरोपींकडून 6 पिस्तूल आणि 120 राऊंड जप्त करण्यात आले आहेत. एटीएस गुजरातच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आल्याचे कोस्टगार्डने सांगितले. अल सोहेली हा पाकिस्तानी मासेमारी बोटीतून दहा क्रू मेंबर्ससह भारतीय हद्दीत घुसखोरी करत होता. त्यांच्याकडून शस्त्रे आणि 40 किलो ड्रग्ज सापडल्याचे कोस्टगार्डने सांगितले. तसेच, या ड्रग्सची बाजारातील किंमत 300 कोटी रुपये आहे. दरम्यान, कारवाईनंतर ही बोट ओखा येथे आणण्यात आली.

पंजाबमध्ये ड्रोनद्वारे तस्करीविशेष म्हणजे पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी बीएसएफने पंजाबमध्ये घुसलेले पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. या ड्रोनद्वारे ड्रग्सचा पुरवठाही केला जात होता. ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत पडले, त्यामुळे तेथील रेंजर्सनी ते नेले. अमृतसरमधील डाओके बॉर्डर चौकीजवळ ही घटना घडली होती. बीएसएफने सांगितले की, सैन्याने परिसरात शोध घेतला, तेव्हा भरोपाल गावात सीमेजवळ 4.3 किलो संशयित हेरॉईन असलेले एक पॅकेट सापडले होते. 

25 किलो हेरॉइन जप्त ड्रोनमधून ड्रोन पॅकेट टाकल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ड्रोनविरोधी कारवाई केल्यानंतर ते (ड्रोन) काही मिनिटे आकाशात उडले आणि नंतर परतताना जमिनीवर पडले. पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरही ड्रग्ज जप्त केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेचा ड्रोनमधून खाली पडण्याशी संबंध नाही. त्यांनी सांगितले की बीएसएफने गेल्या मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास फाजिल्का जिल्ह्यातील एका शेतातून 25 किलो संशयित हेरॉइन जप्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPakistanपाकिस्तान