शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढण्याचा मोह बेतला जीवावर; ट्रेनने धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 08:48 IST

रेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे.

ठळक मुद्देरेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावरून हा तरूण जात होता. कानात मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याने गाडीचा हॉर्न त्या तरूणाला ऐकु आला नाही.

नवी दिल्ली- रेल्वे रूळावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फीचा नाद अनेकांना भोवल्याची बरीच उदाहरणं आपण रोज पाहतो आहे. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. रेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावरून हा तरूण जात होता. कानात मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याने गाडीचा हॉर्न त्या तरूणाला ऐकु आला नाही त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने या मुलाचा मृत्यू झाला. 

अरबाज (वय 18) असं या तरूणाचं नाव असून तो तेथिल सरकारी शाळेत शिकत होता. क्लासला जाण्यासाठी तो घरातून निघाल्यावर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावर अरबाजचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या बाजूला पोलिसांना इअरफोन्स सापडले आहेत. अपघातानंतर अरबाजचा मोबाइल फोन चोरी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रेल्वे रूळावरून चालत जात असताना अरबाज मध्येच थांबून सेल्फी काढत होता, अशी माहिती जीआरपीने दिली आहे. रेल्वे रूळावरून जात असताना अरबाज मोठ्या आवाजात गाणी ऐकत होता, त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्याला ऐकु आला नसावा, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास अजून सुरू आहे. तसंच सेल्फी काढण्याच्या मोहातच अरबाजचा जीव गेला आहे का? याबद्दल माहिती देणारा अजून कुठलाही साक्षीदार पोलिसांना मिळाला नाही. या घटनेमागे हत्येची शक्यताही नाकारता येत नाही, असं पोलिसांचं मत आहे. 

अपघातानंतर एक तास अरबाजचा मृतदेह रेल्वे रूळावरच पडून होता. वेलकम स्टेशनवरू जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांना मृतदेह दिसल्यावर त्यांनी नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती दिली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आला. अपघात स्थळापासून अरबाज फक्त एक किलोमीटर अंतरावर राहत होता. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणी अरबाजच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत. क्लासला जाताना अरबाज त्याच्या काही मित्रांना भेटायचा त्याच मित्रांची चौकशी सुरू आहे. दररोज क्लासला जाताना अपघात झालेल्या मार्गावरूनच तो जायचा का ? या अनुषंगाने मित्रांची चौकशी केली जातीये.