शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दूरसंचार कंपन्यांच्या योजना आता ‘ट्राय’च्या वेबसाइटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:56 IST

एकाला एक दर आणि दुसºयाला दुसरा... अशा बार्गेन करण्याच्या युगात टेलिकॉम कंपन्यांचेही अनेक दर समोर आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एकाला एक दर आणि दुसºयाला दुसरा... अशा बार्गेन करण्याच्या युगात टेलिकॉम कंपन्यांचेही अनेक दर समोर आले आहेत. आपल्याला आपली दूरसंचार कंपनी अधिक दर तर लावत नाही ना, अशी शंका अनेकांना नेहमी येत असते. हीच समस्या आता दूरसंचार नियामक प्राधिकरण दूर करणार आहे. दूरसंचार ग्राहकांना आता विविध कंपन्यांच्या योजना दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय)वेबसाइटवर पाहता येणार आहेत. ट्रायचेअध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी ही माहिती दिली.विमा, एअरलाइन्सचे दर ज्याप्रमाणे आॅनलाईन पाहिले जातात, त्याचप्रमाणे दूरसंचारचे विविध योजनांचे दर या वेबसाइट वा अ‍ॅपच्या माध्यमातून पाहता येतील. ट्रायने अलीकडेच सर्व दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट केले आहे की, त्यांनी आपल्या योजनांचे दर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातही जाहीर करावेत. दूरसंचार कंपन्यांकडून दरवर्षी साधारणपणे २४ हजार दर दाखल केले जातात. यात विविध सर्कलमधील आॅपरेटर्सच्या शुल्क योजना आणि विशेष शुल्क योजना यांचाही समावेश आहे.शर्मा यांनी सांगितले की, आम्ही फक्त पारदर्शी शुल्क वेबसाइटवर दाखविणार नाही, तर यात मशिन रिडेबल डेटा असेल. त्या माध्यमातून नागरिकांना आपल्या आवडीनुसार अर्ज करता येईल आणि जे हवे ते निवडता येईल. यासोबत एपीआय कोड पुरविण्यात येईल. ट्रायच्या साइटवर प्रदर्शित करण्यात आलेल्या दरावर आधारित उत्पादन बनविण्याची परवानगी अ‍ॅप निर्मात्यांना देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, विमा क्षेत्रातील अ‍ॅपच्या माध्यमातून अशी विचारणा होते की, कोणती पॉलिसी सर्वोत्कृष्ट आहे? अन्य योजनांशी याची तुलना केली जाऊ शकते. ज्या माध्यमातून ग्राहकांना आवडीनुसार पर्याय निवडता येईल.शर्मा यांनी सांगितले की, याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे. दूरसंचार कंपन्यांनानाही आम्ही सांगितले आहे की, आॅनलाइन डेटा जमा करावा. जेणेकरून त्यांच्या कामाचा ताण कमी होईल.दरम्यान, आपली नेटवर्क कंंपनी बदलू इच्छिणाºया ग्राहकांना काही आॅपरेटर्सनी विशेष आॅफर देऊ केल्याचा आरोप रिलायन्स जिओने या वर्षीच्या सुरुवातीला केला होता. जिओने आरोप केला होता की, अशा आॅफर गुप्तपणे ग्राहकांना देऊकेल्या जातात. त्या आॅफर प्रत्यक्षात कंपनीच्या वेबसाइटवर दिसूनयेत नाहीत.>ग्राहकांचे हितविविध कंपन्यांच्या योजना ट्रायच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार असल्यामुळे, यात ग्राहकांचा फायदा होणार आहे. पारदर्शकतेसोबतच ग्राहकांना आपली योजना निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.