कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जण जखमी; अंगावर काटा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:23 PM2021-03-22T22:23:30+5:302021-03-22T22:23:48+5:30

telangana over 100 injured as stand collapses at kabaddi championship: जखमींवर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू; दोघांची प्रकृती गंभीर

telangana over 100 injured as stand collapses at kabaddi championship in suryapet | कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जण जखमी; अंगावर काटा आणणारा VIDEO

कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जण जखमी; अंगावर काटा आणणारा VIDEO

googlenewsNext

हैदराबाद: तेलंगणातल्या सूर्यापेटमध्ये ४७ व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेच्या आयोजनादरम्यान गॅलरी कोसळली. यामध्ये १०० हून अधिक जण जखमी झाले. यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (telangana over 100 injured as stand collapses at kabaddi championship)

कबड्डी स्पर्धेतला सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी अचानक गॅलरी कोसळली. सूर्यापेट इथल्या मैदानात तीन गॅलरी आहेत. प्रत्येक गॅलरीची क्षमता ५ हजार प्रेक्षक इतकी आहे. तर मैदानाची प्रेक्षक क्षमता १५ हजार इतकी आहे.



या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात स्टँड कोसळल्यानं एकच गोंधळ माजल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेली गॅलरी काही क्षणांत कोसळत असल्याचं दृश्य व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. यानंतर लोकांची आरडाओरड ऐकू येते. या स्पर्धेत २९ राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते.

Web Title: telangana over 100 injured as stand collapses at kabaddi championship in suryapet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी