शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:30 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे.

- धनाजी कांबळे

हैैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे. त्यासाठी तेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीच पुढाकार घेतला आहे.माजी खासदार व टीडीपीचे कार्यकारिणी सदस्य नंदामुरी हरीकृष्णा यांच्या सुहासिनी कन्या आहेत. हरीकृष्णा यांचा आॅगस्टमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांची कन्या तेथून सहज विजयी होईल, असा विश्वास टीडीपी नेत्यांना आहे. काँग्रेस आघाडीमध्ये टीडीपीला १४ जागा मिळाल्या आहेत. त्यातच सुहासिनी यांना सामावून घेण्यात आले आहे.सुहासिनी यांनी अर्ज भरावा यासाठी एन. चंद्राबाबू नायडू यांनीच आग्रह केला होता. सुहासिनी यांनी होकार कळवला आहे. टीडीपीचे खासदार चंद्रू श्रीहरी यांचे पुत्रश्रीनाथ हे सुहासिनी यांचे पती आहेत. तेलगू चित्रपटांतील नंदामुरी कल्याण राम व एनटी रामाराव ज्युनिअर हे सुहासिनी यांचे भाऊ आहेत. कुकटपल्ली मतदारसंघात खम्मा समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असून, आंध्र व रायलसीमाला जोडून हा मतदारसंघ आहे.टीआरएसला मतदान न करण्याची शपथसिद्दीपेठ जिल्ह्यातील तोगुटा गटातील सुमारे ४००० शेतकऱ्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) मतदान न करण्याची शपथ घेतली आहे. गोदावरी नदीवर प्रस्तावित असलेल्या कलमेश्वर प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यास शेतकºयांचा विरोध आहे. सरकार मात्र या प्रकल्पासाठी आग्रही आहे.जोपर्यंत आमच्या मागण्यांचाविचार केला जात नाही, तोपर्यंत जमिनीचे संपादन करू नये, अशी शेतकºयांची भूमिका आहे. तब्बल ९८०० कोटींचा हा प्रकल्प असून, त्यासाठी १२ लाख एकर जमीन संपादित केली जाणार आहे. सिद्दीपेठ, मेडक आणि रंगारेड्डी जिल्ह्यांतील शेतकरी यामुळे बाधित होणार आहेत.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018