शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तेलंगणात आता प्रचारफैरींचा झंझावात; भर स्टार प्रचारकांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:46 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल

- धनाजी कांबळे

हैैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल. राज्यात सर्वात शेवटी म्हणजे ७ डिसेंबरला मतदान होणार असले तरी वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. राज्यात टीआरएस, भाजपा आणि काँग्रेस-तेलगू देसम-सीपीआय-तेलंगणा जन समिती आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.आरोप-प्रत्यारोपांचा प्रचारफैरी झडू लागल्याने सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाक्षाध्यक्ष अमित शहा यांचे प्रचारदौरे होणार आहे. याशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री व टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही प्रचारसभा गाजवतील.स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेल्या तेलंगणात प्रथमच सोनिया गांधी सभा घेणार आहेत. त्या २३ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये जाहीर सभा घेतील, तर २८, २९, ३० नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या राज्यात प्रचारसभा होतील. तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा २५ नोव्हेंबरपासून तीन दिवस प्रचारसभा घेणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के. टी. रामाराव, पुतणे टी. हरीश राव यांनी याधीच प्रचार सुरू केला असला तरी, त्यांच्याही प्रचारांचा झंझावात यापुढे पाहायला मिळणार आहे. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि एन. टी. रामाराव यांचे पुत्र एन. बालकृष्ण हे प्रचारदौऱ्यात मुख्य आकर्षण राहणार आहेत. काँग्रेस आघाडीत सहभागी असलेले तेलंगणा जन समितीचे नेते एम. कोडनदरम यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. शेतकरी प्रश्न, शिक्षण, रोजगार, आरक्षणयासह विविध मुद्द्यांवर विरोधक टीआरएसवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.निवडणुकीत तीन महत्त्वाच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डी, एमआयएमचे नेते अकबरूद्दिन ओवेसी आणि भाजपचे नेते जी. किशन रेड्डी यांचा समावेश आहे. नलगोंडी येथील हुजूरनगर मतदारसंघातून उत्तमकुमार रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे.टीआरएस सरकार अपयशी ठरले असून, काँग्रेस, टीडीपी, सीपीआय आघाडीला तेलंगणातील जनता साथ देईल, असे त्यांनी म्हटले आहे. अकबरूद्दिन ओवेसी हे असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू असून, त्यांनी हैैदराबाद विभागात चंद्रयंगुट्टा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे, तर भाजपाच्या किसन रेड्डी यांनी अंबरपेठ येथून अर्ज भरला आहे.भाजपावर तेलगू देसमचे टीकास्त्रभारतीय जनता पार्टीचे नेते देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. भाजपाने गेल्या चार-साडेचार वर्षांत विरोधी पक्षांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचाच प्रयत्न केला, अशी टीका आंध्र प्रदेश राज्याचे अर्थमंत्री आणि तेलगू देसमचे नेते रामकृष्णाडू यांनी केली आहे. भाजपाचा कारभार तुघलकी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरांची नावे बदलून क्रांती होणार नसून, सर्वसामान्य माणसांचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी टीडीपीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018