शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"गरज पडल्यास लष्कराच्या छावणीचं वीज-पाणी कापू"; तेलंगणाच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 17:06 IST

KTR Rao : केटीआर राव यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. केटीआर हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. तरीही त्यांनी असं विधान करावं हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे.

नवी दिल्ली - तेलंगणाचे (Telangana) आयटी मंत्री आणि टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर राव (KTR Rao) यांनी विधानसभेत एक वादग्रस्त विधान केलं आहे. हैदराबादच्या नाला विकास प्रकल्पावर उत्तर देताना केटीआर राव यांनी हे विधान केलं आहे. लष्करी छावणीच्या (Cantt Area) अंतर्गत आम्ही गरज पडेल तेव्हा वीज आणि पाणी कापू. लष्कराकडून मनाला वाटेल तेव्हा रस्ता बंद केला जातो. हे योग्य नाही. त्यामुळे आम्हीही त्यांचं वीज, पाणी कापू शकतो, असं केटीआर राव यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपाने यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केटीआर राव यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केटीआर राव यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. केटीआर हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. तरीही त्यांनी असं विधान करावं हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. त्यांच्या मनात लष्कराविषयीचा सन्मान नाही हेच दिसून येतं, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते एनव्ही सुभाष यांनी केली आहे. लष्कराबाबतची सरकारची काय मते आहेत, हेच या विधानातून दिसून येत असल्याचंही सुभाष यांनी सांगितलं.

सरकारचं कोणी ऐकत नाही तेव्हा ते धमकी द्यायला सुरुवात करतात. लोकांचं काम न करणाऱ्या या सरकारला जनता लवकरच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. तेलंगणा सरकारमध्ये काही समस्या असतील तर त्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. तसेच समस्येतून मार्ग काढला पाहिजे, असं भाजपा प्रवक्ते सुभाष यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची प्रकृती बरी नाही. त्यांनी काल वैद्यकीय चाचणी करून घेतली. चंद्रशेखर राव यांची प्रकृती चांगली असून घाबरण्याचं काही कारण नाही, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान तपासणी केल्यानंतर चंद्रशेखर राव हे घरी निघून गेले. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारणBJPभाजपा