शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयुक्तांविरुद्ध FIR चे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना उच्च न्यायालयाने केले निलंबित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 13:47 IST

एमपी-एमएलए न्यायालयाच्या या न्यायाधीशांचे नाव जया कुमार आहे.

तेलंगणा उच्च न्यायालयाने एमपी-एमएलए न्यायालयाच्या न्यायाधीशाला निलंबित केल्याचे वृत्त आहे.अलीकडेच एमपी-एमएलए न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, एमपी-एमएलए न्यायालयाच्या या न्यायाधीशांचे नाव जया कुमार आहे. न्यायाधीशांच्या निलंबनाचा निर्णय प्रशासकीय असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या एफआयआरविरोधात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने न्यायाधीशांवर ही कारवाई केली. खासगी तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायिक अधिकाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता आणि तक्रारदाराचे म्हणणे न नोंदवता घाईघाईने निर्णय घेतल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने सांगितले की, अधिकाऱ्याने आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले नाही. या प्रक्रियेत मोठी चूक झाली आहे.

दरम्यान, राघवेंद्र राजू नावाच्या व्यक्तीने सीआरपीसीच्या कलम २०० अंतर्गत तक्रार दाखल केली होती. राघवेंद्र राजू यांच्या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने हे प्रकरण पोलिसांकडे पाठवले. तसेच, ११ ऑगस्ट रोजी तेलंगणा पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री व्ही श्रीनिवास गौड, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर अधिकार्‍यांवर एफआयआर नोंदवला.

प्रतिज्ञापत्रात फेरफार केल्याचा आरोप २०१८ मध्ये निवडणूक लढवताना तथ्य लपवण्यासाठी व्ही श्रीनिवास गौड यांनी प्रतिज्ञापत्रात फेरफार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या संगनमताने प्रतिज्ञापत्रातवर कोणतीही कारवाई न करता प्रकरण बंद केले, असे तक्रारदार राघवेंद्र राजू यांनी म्हटले होते. दरम्यान, तक्रारदाराने उत्पादन शुल्क मंत्र्यांचे नाव आरोपी म्हणून ठेवले होते तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर अधिकाऱ्यांना सहआरोपी केले होते. सूत्रांनी आदेशाचा हवाला देत सांगितले की, तेलंगणा नागरी सेवा नियम १९९१ अंतर्गत उच्च न्यायालयाने एमपी-एमएलए न्यायालयाच्या न्यायाधीशांना निलंबित केले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाCourtन्यायालय