शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"तेलंगणात तुमची प्रतिमा आईसारखी, आगामी निवडणूक इथूनच लढवा", रेवंत रेड्डींनी घेतली सोनिया गांधींची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 08:59 IST

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच सोनिया गांधींना तेलंगणातून निवडणूक लढवण्याचा ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती रेवंत रेड्डी यांनी दिली आहे.  

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक तेलंगणातून लढण्याचे आवाहन रेवंत रेड्डी यांनी केले. तसेच, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच सोनिया गांधींना तेलंगणातून निवडणूक लढवण्याचा ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती रेवंत रेड्डी यांनी दिली आहे.  

आंध्र प्रदेशातून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे तेलंगणातील लोक सोनिया गांधींना आपली 'आई' मानतात आणि त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील कोणत्याही जागेवरून लढवावी अशी इच्छा आहे, असे रेवंत रेड्डी म्हणाले. दरम्यान, याबाबत सोनिया गांधी यांनी योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क, राज्याचे महसूल, माहिती आणि प्रसारण मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हेही उपस्थित होते.

या भेटीदरम्यान, रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची माहिती सुद्धा दिली. रेवंत रेड्डी म्हणाले, सहा आश्वासनांपैकी महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि आरोग्यश्री अंतर्गत आरोग्य कवच 5 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढवणे, अशी दोन आश्वासने यापूर्वीच लागू करण्यात आली आहेत. तसेच, राज्य सरकार आता 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा आणि 500 ​​रुपयांना गॅस सिलिंडर, ही दोन आश्वासने लागू करण्यास तयार आहे. 

याचबरोबर, सरकारने मागास जातींची जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने तयारी वेगाने सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींना सांगितले. याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणा काँग्रेस राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत असून पक्षाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून पक्षाकडे अर्ज येत आहेत. पक्षाचे नेतृत्व अर्जांची छाननी करेल आणि निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांची निवड करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींना सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीTelanganaतेलंगणाlok sabhaलोकसभा