शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त, मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:57 IST

तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

हैदराबाद - तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची  शिफारस राज्यपालांकडे केली. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला असून, राज्याची विधानसभा बरखास्त केली आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तेलंगाणामध्ये विधानसभेसाठी रणधुमाळी रंगणार आहे. 

 नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगाणामध्ये 2014 साली विधानसभेसाठी पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. तेलंगाणा विधानसभेची मुदत 2019 मध्ये संपणार असून, विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रच निवडणूक होणे नियोजित होते. मात्र राज्यातील राजकीय समिकरणांचा विचार करून विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आज झालेल्या घेतला आहे. दरम्यान, तेलंगणाचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

 

तेलंगणामध्ये काँग्रेस आणि टीडीपीमध्ये जवळीक वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढण्याची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळण्याचा अंदाज आहे. तसे झाल्याच तेलंगणामध्येही काँग्रेसला बळ मिळून त्यांचा सामना करणे टीआरएसला जड जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील विधानसभेची निवडणूक उरकून संभाव्य आव्हान टाळण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग निवडला आहे.119 सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेमध्ये सध्या टीआरएसचे 90 सदस्य असून, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 तर भाजपाचे पाच सदस्य आहेत.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारणnewsबातम्या