शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा विधानसभेसाठी बीआरएसची ११५ उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री केसीआर २ जागांवर लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:52 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) आगामी निवडणुकांसाठी बीआरएसच्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली. 

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. यादरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) आगामी निवडणुकांसाठी बीआरएसच्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली. 

या यादीत सात उमेदवारांचे नाव बदलण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री केसीआर हे गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. तर राज्य सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र केटीआर सिरिल्लामधून निवडणूक लढवणार आहेत. तेलंगणा विधानसभेसाठी ११९ जागा असलेल्या राज्यात सत्ताधारी बीआरएसने ११५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. केवळ गोशामहल, नामपल्ली, नरसापूर, जनगाव या जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

बीआरएसने आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच यादी जाहीर केली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, आमची AIMIM सोबतची मैत्री कायम राहील.आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा १६ ऑक्टोबर रोजी वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल. दरम्यान,मुख्यमंत्री केसीआर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ९५-१०५ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, तेलंगणाच्या ११९ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत.

'या' नेत्यांना मिळाली उमेदवारीबीआरएसने जाहीर केलेल्या या यादीत सिरपूर मतदारसंघातून कोनेरू कोनप्पा, चेन्नूरमधून (एससी)  बाल्का सुमन, बेल्लमपल्लीमधून (एससी) मधून दुर्गम चिन्नैया, मंचेरीलमधून नदीपेल्ली दिवाकर राव, आसिफाबाद (एसटी) येथून कोवा लक्ष्मी यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच, खानापूरमधून (एसटी) भुक्या जॉन्सन राठोड नाईक, आदिलाबादमधून जोगू रामण्णा, बोथमधून(एसटी) अनिल जाधव, निर्मलमधून अल्लोला इंद्रकरण रेड्डी, माडहोलमधून गड्डीगारी विठ्ठल रेड्डी, बांसवाडामधून पोचाराम श्रीनिवास रेड्डी, बोधनमधून मोहम्मद शकील अमीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव