शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मला पुन्हा सत्ता द्या, वृद्धांची पेन्शन पाच हजार करताे! मुख्यमंत्री राव यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 09:06 IST

Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये सत्तेवर आल्यास वृद्धांना दर महिना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. 

वारंगल - तेलंगणामध्ये सत्तेवर आल्यास वृद्धांना दर महिना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. 

वारंगल येथील सभेत मंगळवारी के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची राजवट पुन्हा तेलंगणात आणूया असा प्रचार काँग्रेस पक्षातर्फे केला जात आहे. मात्र इंदिरा गांधी यांच्या राजवटीत गोळीबार, चकमकी असे अनेक प्रकार घडले होते. १९६९ साली तेलंगणा राज्य निर्मितीची मागणी करणाऱ्या ४०० आंदोलकांचा तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता, असा आरोप के. चंद्रशेखर राव यांनी केला.

ते म्हणाले की, तेलंगणात अनेक बाबतीत देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्नाबाबत तेलंगणा हे गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. वरंगळ हे तेलंगणातील दुसरे मोठे शहर  असून,  वरंगळ शहरात आणखी नागरी सुविधा वाढविल्या जाणार आहेत असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 

‘...तर मी राजकारण संन्यास घेईन’- काँग्रेसशासित राज्यांमध्ये तेलंगणापेक्षा एक जरी अतिरिक्त नोकरी दिली गेली असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मुख्यमंत्री राव यांच्या कन्या के. कविता यांनी दिले. - काँग्रेसने दिलेल्या सहा आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची शपथ तेलंगणातील काँग्रेस नेते भट्टी विक्रमार्का यांनी घेतली होती. त्यावर कविता यांनी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती