शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बापमाणूस! नवजात बाळाच्या आईचा मृत्यू, मिळालं नाही दूध; वडिलांनी केली 10 किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:38 IST

बाळाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर बाळाला दूध पाजणं हे वडिलांसाठी आव्हान बनले.

तेलंगणातील आदिलाबादमध्ये नवजात बाळाला पाजण्यासाठी एका कुटुंबाकडे दूध नसल्याची घटना समोर आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर बाळाला दूध पाजणं हे वडिलांसाठी आव्हान बनले. या वडिलांना दूध आणण्यासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागली. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारचे मंत्री टी. हरीश राव यांनी तातडीने एक्शन घेत मदत केली. मंत्र्यांनी कुटुंबासाठी गायीची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले जेणेकरुन कुटुंबाला बाळाची योग्य काळजी घेता येईल. नुकतीच घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, लोकांनी बाळाचा जीव वाचवण्यासाठी वेळेवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंत्र्यांचे कौतुक केले. जंगबाबू आणि कोडापा पारूबाई हे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रावेली मंडलातील राजुगुडा या दुर्गम गावातील रहिवासी आहेत. 

इंद्रावेली येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात पारूबाई यांनी जानेवारी महिन्यात एका मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पारूबाई आणि बाळाला त्यांच्या मूळ गावी आणले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पारूबाई यांचा 10 दिवसांनी मृत्यू झाला. ज्या दुर्गम खेडेगावात हे कुटुंब नवजात मुलीसह राहत आहे, तेथे शेळी, गाय अशी दुभती जनावरे उपलब्ध नव्हती.

गावात दुधाची पाकिटे उपलब्ध नसल्यामुळे वडिलांना दररोज 10 किलोमीटर पायी चालत जावे लागायचे. यानंतर ही बाब अर्थमंत्री हरीश राव यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या सूचनेवरून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला पाहायला जाऊन दुधाची पाकिटे व पौष्टिक अन्नाची पाकिटे कुटुंबीयांना दिली. त्यांनी मुलाच्या प्रकृतीची माहिती घेतली. मुलाचे वडील जंगबाबू यांच्या इच्छेनुसार या कर्मचार्‍यांनी एक गाय खरेदी करून ती गाय नातेवाईकांच्या स्वाधीन करत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"