पाटणा : पत्नी ऐश्वर्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत असलेले तेजप्रताप यादव यांनी रांची येथे आपले वडील लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर ते अद्याप घरी परतलेलेच नाहीत, असे त्यांच्या कुटुंबियांनी बुधवारी सांगितले.दिवाळीत तरी थोरला मुलगा पुन्हा घरी परतेल या आशेने त्यांची आई व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र, तेजप्रताप यादव सोमवारपासून वाराणसीतच मुक्काम ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. ते बेपत्ता झाल्याच्या बातम्या पसरल्या. मात्र, आपल्या काही समर्थकांशी ते सातत्याने संपर्कात आहेत, असे राष्ट्रीय जनता दलाच्या सूत्रांनी सांगितले. ऐश्वर्याशी घटस्फोट घेण्याच्या तेजप्रताप यांच्या विचाराला त्यांच्या कुटुंबातील कोणीही पाठिंबा दिला नाही. या कारणाने ते अस्वस्थ आहेत.
तेजप्रताप यादव अजूनही घरी परतले नाहीत; वाराणसीतच असल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 04:51 IST