शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी, नशेत घागरा-चोळी घालून करतात डान्स, ऐश्वर्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:22 IST

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी ऐश्वर्या यांनी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला असून सुरक्षेतेची मागणी केली आहे.

पटना : बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी  म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी ऐश्वर्या राय यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात तेजप्रताप यादव गांजा ओढत असल्याचे तसेच नशेत घागरा आणि चोळी परिधान करत राधा बनून डान्स करतात, असे ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी ऐश्वर्या यांनी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला असून सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, ऐश्वर्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे माहीत झाले. ते स्वत: ड्रग्ज घेतात आणि नशेत स्वत:ला भगवान शिवाचा अवतार असल्याचा दावा करतात. याशिवाय, घागरा-चोळी परिधान करुन राधाच्या वेशात सांगतात,'राधा ही कृष्ण आहे आणि कृष्ण ही राधा आहे'.

याचबरोबर, तेजप्रताप यादव यांना असे करण्यास रोखले असता म्हणतात, 'गांजा तर भोले बाबाचा प्रसाद आहे, त्याला नकार कसे देणार!' दरम्यान, याबाबत सासरच्या मंडळींना सांगितले असता त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे ऐश्वर्याने म्हटले आहे. तेजप्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात पटत नसल्याने लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली. नोव्हेंबर 2018 मध्ये तेजप्रताप यांनी पटनाच्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, ऐश्वर्या राय यांचे वडिल चंद्रिका राय हेही बिहार सरकारमध्ये मंत्री होते. ऐश्वर्या राय यांचे आजोबा दादा दरोगा राय 16 फेब्रुवारी 1970 ते 22 डिसेंबर 1970 या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्री होते. 

 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार