नवी दिल्ली : २००२ च्या दंगलीत बेचिराख झालेल्या अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी येथे संग्रहालय बांधण्यासाठी गोळा केलेल्या निधीत कथित अफरातफर केल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीला अटक न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात पोलिसांना दिले.‘या प्रकरणात अर्जदारांना अटक केली जाणार नाही’, असे निर्देश न्यायालयाने तीस्ता व त्यांच्या पतीचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती करणाऱ्या अर्जावरील आपला निर्णय राखून ठेवताना दिले.तपासादरम्यान सेटलवाड व जावेद आनंद यांना त्यांच्या लेखापालासह गुजरात पोलिसांपुढे हजर राहण्याची परवानगी द्यावी, ही विनंतीही न्यायालयाने मान्य केली.