शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीच्या काळात कांदा आणणार ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:44 IST

खरीपाला उशीर : टंचाई निर्माण झाल्यामुळे होणार भाववाढ

ठळक मुद्देप्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मानक संस्था क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, खरीप हंगामास झालेला उशीर आणि इतर काही कारणांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, देशातील कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस पडला. अनेक ठिकाणी पाऊस पडलाच नाही. यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवा कांदा बाजारात यायलाही उशीर होईल. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात.

प्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळानेही कांद्याचे नुकसान केले आहे. इतरही काही कारणांमुळे कांदा महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. क्रिसिलने म्हटले की, ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणात ९ टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याच्या उत्पादनात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तथापि, ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे उत्पादन बाजारात येईल. त्या आधीच कांद्याच्या दरात वाढ होईल.

२०१८ च्या तुलनेत दर होतील दुप्पट २०१८ च्या तुलनेत यंदा कांद्याचे दर १०० टक्क्यांनी (दुप्पट) वाढू शकतात. यंदा खरीप हंगामात कांद्याची घाऊक किंमत ३० रुपयांच्या पुढे जाऊ शकते. गेल्या वर्षी हा दर थोडा कमी होता. २०१८ हे कांद्याच्या दरांसाठी सामान्य वर्ष मानले जाते. यानंतर कांद्याचा दरात सतत वृद्धी होत आहे. २०२० मध्ये देखील कांद्याचे दर २०१८ च्या तुलनेत दुप्पट झाले होते.

टॅग्स :onionकांदा