शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

संघाचा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव शनिवारी, अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 9:50 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रविदास साधूसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास हे उपस्थित राहणार आहेत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रविदास साधूसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास हे उपस्थित राहणार आहेत तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व जालंधर येथील श्री गुरू रविदास साधूसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास महाराज यांना संघाने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून सामाजिक समरसतेचा संदेश दिला आहे. दलित समाजात त्यांना मान्यता असून त्यांनी अनेक विकासकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गरीब व दलित समाजाच्या उत्थानासाठी त्यांचे विशेष काम चालते. बाबा निर्मलदास महाराज मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘म्युनिसिपल वर्कर्स संघ’ या संस्थेचे ते अ. भा. प्रमुख संरक्षक व ‘अखिल भारतीय हरिजन लीग’चे राष्ट्रीय महामंत्री सत्यप्रकाश राय यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे संघाचा विजयादशमी उत्सव हा सामाजिक समरसतेचा उत्सव मानण्यात येतो. बुद्ध, मुस्लिम, जैन, शीख इत्यादी धर्माचे व पंथांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होत आले आहेत.

शासन-समाज समन्वयावर भाष्य करणार सरसंघचालक

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेची झालेली अवस्था आणि केंद्राची भूमिका यावर सरसंघचालक नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  संघाच्या गणवेशात ‘फुलपॅन्ट’चा समावेश झाल्यानंतरचा हा दुसरा विजयादशमी उत्सव राहणार आहे.

केंद्र शासनाची कामगिरी, चिनी वस्तूंविरोधात संघाने घेतलेली भूमिका, पाकिस्तान व चीनसंदर्भातील शासनाचे धोरण, केरळ तसेच पश्चिम बंगालमध्ये संघ स्वयंसेवकांवर होणारे हल्ले, सामाजिक समरसता, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. 

‘व्हीव्हीआयपी’ स्वयंसेवक येणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित राहणार आहेत. सद्यस्थितीत राजकीय परिघातून काहीसे बाहेर गेलेले अडवाणी बºयाच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.  याशिवाय या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. सोबतच शहरातील खासदार, आमदार यांचीदेखील उपस्थिती असेल.

स्वयंसेवकांमध्ये उत्साह

देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा चौथा विजयादशमी उत्सव असला तरी शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा, चीन व पाकिस्तानविरोधातील केंद्र शासनाचे कडक धोरण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  या सोहळ््याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. 

कोण आहेत बाबा निर्मलदास

बाबा निर्मलदास यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सहभाग असतो. त्यांच्या संस्थेद्वारे रसूलपूर येथे सर्व आधुनिक सुविधांनीयुक्त असे धर्मार्थ रुग्णालय तसेच दोन शाळा चालविण्यात येतात. दरवर्षी ते जम्मू काश्मीर ते हरिद्वार अशी एक यात्रा आयोजित करतात ज्यामध्ये हजारो भाविकांचा सहभाग असतो. हरिद्वारला त्यांनी श्री गुरू रविदास घाट, श्री गुरू रविदास द्वार व श्री गुरू रविदास धर्मशाळा बांधलेली आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत