शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींचा पगार खरंच शिक्षकांपेक्षा कमी?; एकदा 'ही' आकडेवारी पाहा अन् सत्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:12 IST

मला ५ लाख पगार मिळतो, त्यातला पावणे ३ लाख टॅक्स जातो; राष्ट्रपती कोविंद यांच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा

कानपूर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कानपूर दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात त्यांचं वेतन आणि त्यावर लागणारा कर याबद्दल भाष्य केलं. मला पाच लाख पगार मिळतो. त्यातला पावणे तीन लाख करात जातो. मग किती रक्कम शिल्लक राहिली?, असा सवाल राष्ट्रपतींनी उपस्थित केला. यापुढे जाऊन राष्ट्रपतींनी अधिकारी आणि शिक्षकांच्या वेतनाची स्वत:ला मिळणाऱ्या वेतनासोबत तुलना केली. कर भरल्यानंतर माझ्याकडे जितकी रक्कम शिल्लक राहते, त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना आणि अन्य लोकांना मिळतो. याठिकाणी काही शिक्षक बसलेत, त्यांनाही सर्वाधिक पगार आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं. या विषयाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

राष्ट्रपतींच्या विधानानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रपतींच्या वेतनावर कधीपासून कर लागू व्हायला लागला, असा सवाल काहींनी उपस्थित केला. अनेकांनी राष्ट्रपतींच्या वेतनासंबंधीचे नियम-कायदे सांगण्यास सुरुवात केली. राष्ट्रपतींचं वेतन तर करमुक्त असतं याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं. राष्ट्रपतींच्या वेतनावर कर आकारला जात असेल असं काही वेळासाठी गृहित धरलं तरीही सध्याची कर रचना पाहता, करांचे टप्पे लक्षात घेता राष्ट्रपतींच्या वेतनातून तितकी रक्कम कापलीच जाऊ शकत नाही, जितकी रक्कम कररुपात कापली जात असल्याचा दावा राष्ट्रपती करत आहेत, इथंपर्यंतचं गणित अनेकांनी केलं. राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुखसोयी एखाद्या शिक्षकाला किंवा अधिकाऱ्याला मिळत नाहीत याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं.राष्ट्रपती म्हणतात, “मला ५ लाख पगार मिळतो, त्यातला पावणे ३ लाख टॅक्स जातो, माझ्यापेक्षा जास्त तर..."

मग सत्य काय?राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वेतनातून खरंच ३० टक्के रक्कम कापली जात आहे. मात्र ही रक्कम कर म्हणून कापली जात नाहीए. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ही रक्कम स्वच्छेनं दान करत आहेत. ही रक्कम दान करण्याचा निर्णय त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात घेतला. कोरोना संकट असल्यानं कोविंद त्यांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम दान करणार असल्याची माहिती गेल्या मे महिन्यात राष्ट्रपती भवनानं दिली होती. राष्ट्रपती भवनातील खर्चात कपात करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. त्यामुळेच राष्ट्रपतींना गेल्या वर्षीपासून ३० टक्के कमी वेतन मिळत आहे. ती रक्कम त्यांनी कर असल्याचं सांगितलं. त्यामुळेच सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद