शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ उत्तीर्ण आयुष्यभर वैध; केंद्राच्या निर्णयानं महाराष्ट्रातील ४० हजार उमेदवारांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:43 IST

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतलेला हा निर्णय रद्द करीत गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नवी घोषणा केली. त्यानुसार एकदा टीईटी उत्तीर्ण झालेला उमेदवार नेहमीसाठी शिक्षकपदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी बंधनकारक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेतील यश केवळ सात वर्षेच वैध मानले जात होते. मात्र, आता एकदा ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवाराचा निकाल आयुष्यभर वैध मानला जाणार आहे. त्यामुळे शिक्षणांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील ४० हजार उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सात वर्षांनंतर शिक्षक भरतीसाठी पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल, असा निर्णय ११ फेब्रुवारी २०११ रोजी घेण्यात आला होता. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतलेला हा निर्णय रद्द करीत गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नवी घोषणा केली. त्यानुसार एकदा टीईटी उत्तीर्ण झालेला उमेदवार नेहमीसाठी शिक्षकपदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे. महाराष्ट्रात २०१३मध्ये पहिल्यांदा टीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ७२ उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची वैधता जुन्या निर्णयानुसार २०२० मध्ये संपुष्टात आली, तर २०१४ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ९ हजार ५९५ उमेदवारांची वैधता यंदा संपुष्टात येण्याची भीती होती. २०१२पासून दहा वर्षात राज्यात शिक्षक भरतीही झाली नाही. आता या ४० हजार ६६७ उमेदवारांना भरतीत सामील होता येईल.