बंगळुरु : एका शिक्षिकेच्या अंगावर वर्गातच रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कर्नाटकात घडली असून या शिक्षिकेच्या व्यावसायिक भागीदारानेच हे क्रूर कृत्य केले आहे. के. जी. सुनंदा (५०) ही शिक्षिका या घटनेत ५० टक्के जळाली असून शिक्षिकेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.बंगळुरुपासून ५५ किमी दूर असलेल्या मगादी येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील आरोपी रेणुकाराध्या याचा पोलीस शोध घेत आहेत. ही शिक्षिका पाचवीतील विद्यार्थ्यांना शिकवत असताना दुपारी एक व्यक्ती या वर्गात आला आणि शिक्षिकेशी वाद सुरु केला. शिक्षिकेने त्याला वर्गाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सोबत आणलेले रॉकेल या शिक्षिकेच्या अंगावर टाकले आणि आग लावली. (वृत्तसंस्था)
शिक्षिकेला वर्गातच जिवंत पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 04:28 IST