शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 2:55 AM

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत.

जम्मू : भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत.भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले. ही युद्धजन्य स्थिती धोकादायकच आहे. जीवितहानी टाळण्यासाठी अभेद्य शिरस्त्राण आणि जाकीट असले तरी शरीराचे इतर भाग असुरक्षितच असतात. पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत विनाकारणगोळीबार करण्याची ही काही पहिली घटना नाही. ३ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. त्यावेळी आम्ही ताकदीने पलटवार करून बदला घेतला होता.पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार :मुलगी ठारजम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि सांबा जिल्ह्यांलगत आंतरराष्टÑीय सीमेवरील भागातील चौक्या आणि गावांवर गोळीबारासोबत केलेल्या तोफमाºयात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. तसेच एक मुलगीही ठार झाली. पाकिस्तानी रेंजर्सनी आर.एस. पुरा, अर्निया आणि रामगढ विभागातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि लष्कराच्या चौक्यांवर निशाणा साधत बुधवारी रात्री ९ वाजेपासून गोळीबारासोबत तोफगोळ्यांचा भडिमार सुरू केला.पाकिस्तानी रेंजर्सच्या या कुरापतींना बीएसएफच्या जवानांनी चोख उत्तर देत पलटवार केला. पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या २० नागरी वस्त्यांना हल्ल्याचे लक्ष्य केले. शेवटचे वृत्त येईपर्यंत गुरुवारी ६.४५ वाजेपर्यंत पाकिस्ताच्या बाजूने अधूनमधून गोळीबार आणि तोफमारा सुरूच होता.यात बीएसएफचा अन्य एक जवान जखमी झाला असून, या जवानाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शहीद झालेला जवान ए. सुरेश तामिळनाडूचा होता. ठार झालेल्या मुलीचे नाव नीलम देवी आहे. पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रबंदीचे उल्लंघन केले जात असल्याने प्रशासनाने अधिकाºयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलPakistanपाकिस्तान