शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 19:35 IST

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या स्वपक्षीय खासदारांनीच जबरदस्त धक्का दिला आहे.

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या स्वपक्षीय खासदारांनीच जबरदस्त धक्का दिला आहे. तेलुगू देसम पक्षाचे चार राज्यसभा खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.  आपण तेलगू देसममधून राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी असे पत्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दिले आहे. तेलगू देसम पक्षाचे राज्यसभा खासदार सी.एम. रमेश, टी.जी. व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वाय. एस. चौधरी यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. सध्या टीडीपीचे राज्यसभेत सहा खासदार असून, सहापैकी चार खासदार एकत्र भाजपात सामील होत असल्याने त्यांना पक्षांतरबंदीचा नियमही लागू होणार नाही. त्यामुळे ते राज्यसभेच्या सदस्यपदी कायम राहतील. दरम्यान, आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आणि राज्याच्या हिताच्या मुद्द्यावर आम्ही भाजपाशी लढा दिला. त्यासाठी आम्ही केंद्रातील मंत्रिपदांवरही पाणी सोडले. तेलगू देसमला दुर्बल बनवण्यासाठी भाजपाने केलेल्या प्रयत्नांचा मी निषेध करतो. असे धक्के पक्षासाठी नवे नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते निराश होणार नाहीत, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.   नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाचा दारुण पराभव झाला होता. पक्षाला लोकसभेच्या 25 पैकी 3 जागांवरच विजय मिळाला होता. तर विधानसभेच्या 175 जागांपैकी केवळ 23 जागांवर टीडीपीला समाधान मानावे लागले होते. 

 

टॅग्स :Telugu Desam Partyतेलगू देसम पार्टीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूBJPभाजपा