शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तलाक विधेयकावरून भाजपविरोधात टीडीपी, एनडीएला राज्यसभेत मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 03:47 IST

तोंडी तलाकच्या विधेयकावर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत मोठा धक्का बसला. एनडीएचा महत्वाचा घटक पक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सी. एम. रमेश यांचे नाव हे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अशी मागणी करणा-यांच्या यादीत पाहून भाजपचे अध्यक्ष अमित शाह व राज्यसभेतील पक्षाचे नेते अरूण जेटली यांना धक्काच बसला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - तोंडी तलाकच्या विधेयकावर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत मोठा धक्का बसला. एनडीएचा महत्वाचा घटक पक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सी. एम. रमेश यांचे नाव हे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अशी मागणी करणा-यांच्या यादीत पाहून भाजपचे अध्यक्ष अमित शाह व राज्यसभेतील पक्षाचे नेते अरूण जेटली यांना धक्काच बसला.विधेयक जेव्हा मतदानाला येईल त्यावेळी विरोधी पक्ष आपल्या बाजुने उभे राहतील व बहुमत मिळवता येईल अशी आशा भाजपला होती. विधेयकाच्या सध्याच्या स्वरुपाला विरोध असलेल्या खासदारांची नावे काँग्रेसने जाहीर केली त्यात सी. एम. रमेश यांचे नाव होते. विशेष म्हणजे तेलगू देसमने लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. टीडीपीची ही कोलांटउडी धक्कादायक होती कारण राज्यसभेत या पक्षाचे सहा खासदार आहेत. भाजपला द्रमुक आणि अण्णाद्रमुकचा पाठिंबा मिळवण्यातही अपयश आले. या दोन्ही पक्षांचे १७ खासदार आहेत. भाजप आणि तेलगू देसम पक्ष यांच्यात फार काही चांगले नाही हे स्पष्ट आहे.टीडीपीने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवायचा हा काही पहिला प्रसंग नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या शपथविधी समारंभालाही उपस्थित नव्हते. आंध्र प्रदेशबद्दल भाजपच्या दृष्टिकोनामुळे नायडू असमाधानी असून संधी मिळताच त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. धक्का बसलेल्या भाजपने सभागृहाचे कामकाज विस्कळीत केले व त्यामुळे ते तहकूब करावे लागले. भाजप व टीडीपीत पडलेले अंतर शूभ संकेत नाहीत. सी. एम. रमेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्याच्या स्वरुपातील विधेयकाला विरोध करण्याच्या पक्षाच्या आदेशाचे मी पालन केले.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकBJPभाजपा