शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

टीबीचे निदान आता फक्त ३५ रुपयांत; ‘आयसीएमआर’ने विकसित केली नवी तपासणी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:54 IST

सध्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार, क्षयराेग नसल्याचे खात्रीदायक निदान हाेण्यासाठी ४२ दिवस लागतात.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : क्षयराेगासारख्या आजाराचे जेवढे लवकर निदान, तेवढे लवकर उपचार करून बरे हाेण्याची शक्यता वाढते. क्षयराेगाचे निदान आता आणखी साेपे आणि स्वस्त हाेणार आहे. भारतीय  वैद्यकीय संशाेधन परिषदेने (आयसीएमआर) केवळ ३५ रुपयांमध्ये रुग्णाच्या केवळ लाळेची तपासणी करून निदान करण्याची नवी आणि साेपी पद्धती विकसित केली आहे. 

आयसीएमआरच्या डिब्रुगड येथील प्रयाेगशाळेने ही नवी पद्धती विकसित केली आहे. त्यात तीन प्रकारे तपासणी केली जाते. सुमारे अडीच तासांमध्ये १,५०० पेक्षा जास्त नमुने एकाच वेळी तपासले जाऊ शकतात. सध्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार, क्षयराेग नसल्याचे खात्रीदायक निदान हाेण्यासाठी ४२ दिवस लागतात.

कशी काम करते नवी पद्धत?‘क्रिस्पर-सीएएस१२ए’ वर रेणूवर आधारित ‘ग्लाे टीबीपीसीआर किट’ बनविण्यात आली आहे. त्यात रॅपिडग्लाे उपकरणाचीही मदत घेण्यात येईल. ही एक पाेर्टेबल किट असून त्यात तीन टप्प्यांमध्ये चाचणी केली जाते. याद्वारे झटपट निदान करता येणार आहे.

आजही क्षयराेगाचे जगासमाेर आव्हान- क्षयराेग हा आजच्या घडीलादेखील जागतिक आराेग्यासमाेर माेठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रणासाठी वेगवान निदानाची गरज आहे. - सध्याच्या निदान पद्धतीद्वारे आजार ओळखण्यास बराच वेळ लागताे आणि महाग आहे. - ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत खर्च वेगवेगळ्या चाचणी पद्धतींनुसार तपासणीसाठी येताे.- ही पद्धत बाजारात उपलब्ध करण्यासाठी लवकरच पात्र कंपन्यांसाठी कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले आहेत.- आयसीएमआर आणि सहयाेगी कंपनीमध्ये आपसी सहयाेगातून संस्था आपल्या अनुभवी शास्त्रज्ञांच्या मदतीने तांत्रिक सहकार्य करेल.

टॅग्स :Healthआरोग्य