शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

करदाते राष्ट्र निर्माते, त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात -वित्तमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:49 IST

करदात्यांच्या हक्काची सनद लवकरच जाहीर करणार; करदात्यांना देणार कालबद्ध सेवा

तंजावर : करदाते हे राष्ट्र निर्माते आहेत. त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.सीतारामन यांनी सांगितले की, करदात्यांच्या हक्कांची सनद सरकार लवकरच जाहीर करणार आहे. प्रामाणिक करदात्यांच्या सोयीसाठी सरकारने याआधी कर व्यवस्थेचे सुलभीकरण, पारदर्शकतेत सुधारणा आणि कर दरांत कपात यासारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.तंजावर येथील प्रसिद्ध सस्त्रा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विधिज्ञ नानी पालखीवाला जन्मशताब्दी समारोहाला संबोधित करताना सीतारामन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असल्याचा मला आनंद आहे. करदात्यांना योग्य प्रकारे सेवा मिळायला हव्यात, असे पंतप्रधानांचे प्रामाणिक मत आहे. आम्ही करदात्यांना त्यांच्या हक्कांचा जाहीरनामा देणार आहोत. जगात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या फारच थोड्या राष्ट्रांत करदात्यांच्या हक्कांचा जाहीरनामा आहे.करदात्यांना हक्कांचा जाहीरनामा मिळायलाच हवा. आम्ही त्या दिशेने प्रयत्न करीत आहोत. मी आत्मनिर्भर भारत मोहिमेत याची घोषणा केली होती. आम्ही लवकरच हा जाहीरनामा घेऊन येत आहोत.अर्थसंकल्पात ‘करदात्यांच्या जाहीरनाम्या’ची घोषणा करण्यात आली होती. त्याचे स्वरूप घटनात्मक असेल. प्राप्तिकर विभागाकडून कालबद्ध पद्धतीने सेवा मिळण्यास करदाते त्याद्वारे पात्र ठरतील.सीतारामन यांनी सांगितले की, या देशातील कर व्यवस्था करदात्यांसाठी अंमलबजाणीच्या दृष्टीने सुलभ आणि सोपी करायला हवी, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेले आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी सरकारने मूल्यमापनाची ‘चेहराविहिन’ पद्धती स्वीकारली. पडताळणीत कपात केली. इतरही अनेक उपाय सरकारने केले आहेत.जगातील सर्वाधिक कमी कर दर असलेल्या देशांत भारताचा समावेशसीतारामन यांनी सांगितले की, सप्टेंबर २०१९ मध्ये आम्ही कॉर्पोरेट करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि आता भारत हा जगातील सर्वाधिक कमी कर दर असलेला एक देश आहे. कॉर्पोरेट कराची पद्धतीही आम्ही अधिक सुलभ केली आहे. त्यात आता कोणालाही सूट आणि लाभ नाही. सीतारामन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करदात्यांना ‘राष्ट्र निर्माते’ असेच संबोधतात. प्रामाणिक करदाते राष्ट्र उभारणीचेच काम करीत असतात. करदाते येणाऱ्या प्रत्येक सरकारला निधी उपलब्ध करून देत असतात. त्याच निधीद्वारे सरकारे सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम राबवितात. गोरगरिबांच्या उपजीविकेसाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन