शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खासगी क्षेत्रातल्या कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; टॅक्स वाचणार

By कुणाल गवाणकर | Updated: October 15, 2020 11:26 IST

सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ खासगी क्षेत्रातल्या कामगारांसाठी मोदी सरकारची योजना

नवी दिल्ली: आधीच संकटात असलेली अर्थव्यवस्था कोरोनामुळे अधिकच अडचणीत सापडली आहे. मोदी सरकारनं अनेक आर्थिक घोषणा करूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. वाढलेली बेरोजगारी, पगार कपात यामुळे अनेकांनी खर्च करताना हात आखडता घेतल्यानं वस्तूंची मागणी घटली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. बाजारातील ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढवण्यासाठी मोदी सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एलटीएमध्ये कॅश व्हाऊचर देण्याची योजना आखली. आता अशाच प्रकारची योजना खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी आखण्यात येत आहे.सरकारी कर्मचारी एलटीसीमध्ये मिळणाऱ्या कॅश व्हाऊचरच्या मदतीनं किमान १२ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू (खाद्यपदार्थांच्या व्यतिरिक्त) खरेदी करू शकतात. आता अशीच योजना खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी आणली जाणार आहे. त्यामुळे एलटीएमधून मिळणाऱ्या पैशातून कर्मचाऱ्यांनी वस्तू खरेदी केल्यास त्यांना करात सवलत मिळेल. इकॉनॉमिक टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.मोदी सरकार नव्या योजनेसाठी व्यवस्था तयार करत असून लवकरच याबद्दलच स्पष्टीकरण जारी करण्यात येईल. कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली असून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे मागणी वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीएमध्ये कॅश व्हाऊचर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आता तशाच प्रकारची योजना खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी आणली जाणार आहे. यामुळे २८ हजार कोटींची अतिरिक्त मागणी निर्माण होईल, असा सरकारचा अंदाज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय घोषणा?अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोनच दिवसांपूर्वी मागणी वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसीच्या बदल्यात कॅश व्हाऊचर देण्याची योजनेचा समावेश होता. या अंतर्गत ३१ मार्च २०२१ पर्यंत १२ टक्के किंवा अधिक जीएटी असलेल्या वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यास विशेष कर सवलत मिळेल. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था