शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

प्राप्तिकर छापे आता केवळ उच्चाधिकारीच मंजूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 02:52 IST

अनधिकृत प्राप्तिकर तपासणी व छाप्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : प्राप्तिकर छापे टाकण्याचा निर्णय मंजूर करण्याचे अधिकार आता केवळ प्राप्तिकर महासंचालक (तपास) व प्राप्तिकर मुख्य आयुक्त (टीडीएस) यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनधिकृत प्राप्तिकर तपासणी व छाप्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर बोडार्ने (सीबीडीटी) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्राप्तिकर कायदा १३३अ अंतर्गत तपासणीचे अधिकार केवळ संचालनालय (तपास) व आयुक्तालय (टीडीएस) कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.१३३अ कायद्यानुसार करण्यात येणारी तपासणीची कारवाई ही एक प्रकारची अनाहूत कृती असून, अत्यंत जबाबदारीने व उत्तरदायित्व लक्षात घेऊन पार पाडली जाते. तपासणीचा अधिकार मिळालेला प्राप्तिकर अधिकारी किंवा इतर अधिकारप्राप्त निरीक्षक हा तपासणी किंवा छाप्यासाठी त्याला नेमून दिलेल्याा कोणत्याही ठिकाणी प्रवेश करू शकतो. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातील ठिकाण किंवा व्यवसाय या ठिकाणी त्याला प्रवेशाचा अधिकार प्राप्त होते.संबंधित अधिकारी त्याला गरजेची असलेली किंवा संबंधित ठिकाणी आढळलेली खातेवही किंवा अन्य कागदपत्रे तपासू शकतो. सीबीडीटीने अन्य एका आदेशात म्हटले आहे की, यापुढे मूल्यांकनाचे निर्णय मंजूर करण्याचे अधिकार नॅशनल ई-असेसमेंट सेंटरने फेसलेस असेसमेंट स्कीम २०१९ द्वारे जारी केले पाहिजेत. जे मूल्यांकनाचे आदेश अशा यंत्रणेमार्फत येणार नाहीत, ते आदेश नसल्यात जमा धरले जातील व ते कधीच देण्यात आलेले नव्हते, असेही समजले जाईल.सीबीडीटीचे दोन्ही आदेश तातडीने अंमलात आले आहेत. भारतात गुरूवारी पारदर्शी कराधान मंचच्या उद्घाटनानंतर या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.उद्घाटनानंतर महत्वपूर्ण घडामोडीमूल्यांकनाचे जे आदेश अशा यंत्रणेमार्फत येणार नाहीत, ते आदेश नसल्यात जमा धरले जातील व ते कधीच देण्यात आलेले नव्हते, असेही समजले जाईल. सीबीडीटीचे दोन्ही आदेश तातडीने अंमलात आले आहेत. भारतात गुरूवारी पारदर्शी कराधान मंचच्या उद्घाटनानंतर या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय