शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Tawang Clash : तवांगमध्ये चीनशी झालेल्या झटापटीवर अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणाले, "हे आता 1962 नाही, चोख उत्तर मिळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:57 IST

India China Clash : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमधील झटापटीवर वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 9 डिसेंबरला झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंच्या काही सैनिकांना किरकोळ दुखापत झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनकडून निवेदन देण्यात आले आहे. 

दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमधील झटापटीवर वक्तव्य केले आहे. हा 1962 चा भारत नाही. भारतीय शूरवीर चीनला चोख प्रत्युत्तर देतील, असे त्यांनी म्हटले आहे.  यासंदर्भात पेमा खांडू यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, "यांगत्से माझ्या मतदारसंघात येतो आणि दरवर्षी मी त्या भागातील जवान आणि गावकऱ्यांना भेटतो. आता हा 1962 नाही. कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आमचे शूर जवान चोख प्रत्युत्तर देतील."

काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिले. चिनी सैन्याने 9 डिसेंबर रोजी तवांग सेक्टरमधील यांगत्से प्रदेशातील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परत जाण्यास भाग पाडले, असे राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. तसेच, या झटापटीत एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक स्तरावरही मांडण्यात आला असून अशा प्रकारची कारवाई करण्यास मनाई करण्यात आली आहे.

चीनने काय सांगितले?तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीवर चीनने सांगितले की, भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्यतः स्थिर आहे. तसेच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे सीमा मुद्द्यांवर सुरळीत संवाद साधला आहे. दरम्यान, वांग यांनी यांगत्से प्रदेशात 9 डिसेंबरला भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची माहिती देण्यास नकार दिला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश