शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुविशारद म्हणून काम करण्याचे राहून गेले; रतन टाटा यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 06:18 IST

१९५९ मध्ये रतन टाटा यांनी मिळवली होती वास्तुविशारदाची पदवी. वास्तुविशारद म्हणून काम करण्याचं राहून गेल्याचं सांगत टाटा यांनी व्यक्त केली खंत. 

ठळक मुद्दे१९५९ मध्ये रतन टाटा यांनी मिळवली होती वास्तुविशारदाची पदवी.वास्तुविशारद म्हणून काम करण्याचं राहून गेल्याचं सांगत टाटा यांनी व्यक्त केली खंत. 

टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे आयुष्यातील एक स्वप्न अधुरेच राहिले आहे. त्यांनी वास्तुविशारदाची (आर्किटेक्ट) पदवी मिळविली होती. मात्र टाटा उद्योगसमूहात व्यग्र झाल्याने वास्तुविशारद म्हणून प्रदीर्घ काळ काम करण्याचे राहून गेले अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातूनरतन टाटा यांनी १९५९ साली वास्तुविशारदाची पदवी मिळविली होती. त्यांना आयुष्यात हाच पेशा स्वीकारण्याची इच्छा होती. मात्र त्यांनी अभियंता व्हावे अशी रतन टाटांच्या वडिलांची इच्छा होती. दोन वर्षे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कळून चुकले की, वास्तुविशारदाच्या शिक्षणातच आपल्याला अधिक रस आहे. मला वास्तुविशारद म्हणून काम करता आले नाही याची नेहमी खंत वाटते, असे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. 

ते म्हणाले की, कॉर्नेल विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर लॉस एंजलिसमध्ये मी दोन वर्षे एका वास्तुविशारदाच्या कार्यालयात नोकरी केली होती. विविध प्रकारची कौशल्ये एका माळेत कशी गुंफायची याचे उत्तम शिक्षण वास्तुविशारदाच्या अभ्यासक्रमातून मिळते. 

आपल्याकडे असलेल्या निधीचा विचार करून त्यानुसार एखाद्या प्रकल्पाची उभारणी करण्याचे कसब वास्तुविशारदाला चांगलेच अवगत असते.  वास्तुविशारद म्हणून व्यवसाय करणे आपल्याला जमत नाही असे विधान एखादी व्यक्ती स्वत:विषयी करते. पण ते योग्य वक्तव्य नाही असेही रतन टाटा म्हणाले. 

कुपोषण समस्या संपली पाहिजेरतन टाटा म्हणाले की, देशातील बालकांमध्ये असलेली कुपोषणाची मोठी समस्या संपविण्यासाठी एक प्रकल्प राबविण्याची इच्छा होती. ते स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाAmericaअमेरिकाuniversityविद्यापीठIndiaभारत