शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे पश्चिम बंगालमध्ये 'मिशन 250', विधानसभेसाठी तयारी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 21:19 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महत्त्वाची रणनीती आखत आहे.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशानंतर आता भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महत्त्वाची रणनीती आखत आहे. एक म्हणजे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या जनाधार असलेल्या नेत्यांना आपल्या पार्टीत सामील करुन घेत आहे. तर दुसरे म्हणजे खालच्या पातळीवर आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.   

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी 294 जागा आहेत. त्यामुळे भाजपाने 'मिशन 250' चे लक्ष्य ठेवले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाने तृणमूल काँग्रेसला चांगलीच टक्कर देत 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फक्त 22 जागा मिळाल्या होत्या. 

लोकसभा निवडणुकीत 40.5 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस भाजपाच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जास्त महत्व देत नाही. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, 'पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नाही.' दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला 40.5 टक्के मतदान झाले आहे. तर, राज्यात विधानसभेच्या सहा जागा भाजपाच्या आहेत.  

250 जागांचे लक्ष्यभाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांना सांगितले की, 'लोकसभेच्या जागांसाठी आम्ही 23 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र 18 जागांवर विजय मिळाला. आता राज्यात विधानसभेच्या 250 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल