शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज 'तनुजा' भारतीय सैन्यात झाली मेजर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:31 IST

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तनुजा सिंग भारतीय सैन्यात मेजर बनल्या आहेत.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तनुजा सिंग भारतीय सैन्यात मेजर बनल्या आहेत. तनुजा सिंग यांनी 2015 साली INHS मुंबई येथे भारतीय लष्कराच्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये लेफ्टनंट म्हणून कायमस्वरूपी कमिशन मिळवले. खरं तर 2017 मध्ये तनुजा सिंग यांचे कॅप्टन पदावर प्रमोशन झाले होते. तर 2021 मध्ये कॅप्टन तनुजा सिंग यांना उत्कृष्ट सेवेसाठी पूर्व कमांड जनरल ऑफिसर कमांडिंग कमेंडेशन मेडलने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, मंडी येथील वल्लभ शासकीय महाविद्यालयाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख फ्लाइंग ऑफिसर डॉ. चमन यांनी म्हटले की, 2022 मध्ये कॅप्टन तनुजा यांचे भारतीय सैन्यात मेजर पदावर प्रमोशन झाले आहे. कॅप्टन तनुजा यांना भारतीय सैन्यात मेजर पद मिळाल्याने मंडी जिल्ह्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

तनुजा यांची गरूडझेप तनुजा यांचे वडील भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समध्ये कार्यरत होते. मात्र वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी तनुजा यांनी त्यांच्या वडिलांना एका अपघातात गमावले. तनुजा यांची आई रेखा कुमारी यांनी अनेक आव्हाने असतानाही त्यांच्या दोन्ही मुलांचे चांगले संगोपन केले आणि उच्च शिक्षण दिले. मेजर तनुजा सिंग यांच्या आईने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी हमीरपूर आणि चंदीगड येथे काम केले. आपल्या घरातील सदस्य मेजर झाल्यामुळे आजी-आजोबा आणि कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. सध्या मेजर तनुजा सिंग दिल्लीत कार्यरत आहेत.

हमीरपुरमध्ये घेतले शिक्षण तनुजा सिंग यांनी त्यांचे शालेय शिक्षण गुरुकुल स्कूल हमीरपूरमधून घेतले. तर INHS मुंबईतून पदवी स्तरावरील शिक्षण पूर्ण केले. तनुजा यांचा लहान भाऊ अंकुज सिंग याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मोहाली चंदीगडमधून एमएससी रसायनशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानWomenमहिलाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी