शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

Tamilnadu Election Result 2021 : अभिनेता कमल हसनने घेतली आघाडी, तामिळनाडूत Dmk ची सरशी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 11:38 IST

तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे.

चेन्नई - कोरोना महामारीच्या सावटामध्ये ४ राज्ये आण‍ि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी रविवार, २ मे रोजी होणार असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुपारपर्यंत विधानसभांचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. 

तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे. येथील निवडणुकीत एडीएमने भाजपासोबत आघाडी केली असून डीएमके स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. सुरुवातीला हाती आलेल्या आकडेवाडीनुसार एम. के. स्टॅलीन यांच्या डीएमकेने 131 जागांवर आघाडी घेतली असून एआयएडीएमकेला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपाला अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही. तर, मक्कल निधी मय्यम पक्षाला केवळ पक्षप्रमुख असलेल्या कोईम्बतूर येथील जागेवरच आघाडी घेता आली आहे. 

कोईम्बतूरमधील सर्वात लक्ष लागलेल्या उमेदवारांच्या निकालात मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख अभिनेता कमल हसन यांनी मोठी आघाडी घेतल्याचे समजते. कमल हसन यांनी काँग्रेसच्या मयुरा जयकुमार यांना मागे टाकले आहे.   

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूcorona virusकोरोना वायरस बातम्याKamal Hassanकमल हासनElectionनिवडणूकTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१