शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

खरंच की काय? महिलेने रद्दीत दिले तब्बल 5 लाखांचे दागिने अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 11:50 IST

घराची साफसफाई करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. महिलेने सफाई करताना पेपरच्या रद्दीत चुकून तब्बल पाच लाखांचे दागिने दिले.

ठळक मुद्देमहिलेने सफाई करताना पेपरच्या रद्दीत चुकून तब्बल पाच लाखांचे दागिने दिले.तामिळनाडूच्या रसीपूरममध्ये ही घटना घडली आहे.  मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या आणि दोन डायमंडच्या अंगठ्या या दागिन्यांचा समावेश होता.

रसीपूरम - घराची साफसफाई करताना अनेकदा पेपरची रद्दी आणि नको असलेल्या गोष्टी या रद्दीवाल्याला दिल्या जातात. काही वेळा चुकून महत्त्वाची कागदपत्रे ही रद्दीत जात असतात. पण जर कोणी लाखोंचे दागिने रद्दीत दिल्याचं सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. घराची साफसफाई करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. महिलेने सफाई करताना पेपरच्या रद्दीत चुकून तब्बल पाच लाखांचे दागिने दिले. तामिळनाडूच्या रसीपूरममध्ये ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका 45 वर्षीय महिलेने घराची साफसफाई करताना चुकून दागिने रद्दीवाल्याला दिल्याची घटना समोर आली आहे. कलादेवी असं या महिलेचं नाव असून तामिळनाडूच्या रसीपूरममधील विग्नेश नगरमध्ये त्या राहतात. रद्दीवाला प्रामाणिक असल्यामुळे त्याने कलादेवींना त्यांचे पाच लाखांचे दागिने परत दिले आहेत. महिलेने रद्दी घेऊन जाण्यासाठी रद्दीवाल्याला घरी बोलावले होते. रद्दीवाला रद्दी घेऊन निघून गेला त्यानंतर रद्दीमध्ये पाच लाखांचे दागिने असल्याचं महिलेच्या लक्षात आले. मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या आणि दोन डायमंडच्या अंगठ्या या दागिन्यांचा समावेश होता. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कलादेवी यांनी या घटनेनंतर परिसरात रद्दीवाल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या माध्यमातून रद्दीवाल्याचा तपास करण्यात आला. त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं. सेल्वराज असं रद्दीवाल्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने दागिने असल्याचं मान्य केलं. 

पोलिसांनी कलादेवींना त्यांचे पाच लाखांचे दागिने परत केले आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेच वाढ झाली आहे. चोरीच्या भीतीने घरामध्ये असलेले लाखोंचे दागिने पेपरमध्ये लपवून ठेवले होते. घरातील साफसफाई करताना चुकून दागिने रद्दीमध्ये गेल्याची माहिती चौकशीदरम्यान कलादेवी यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपास करून रद्दीवाल्याचा शोध घेतला. तर त्याच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन कलादेवी यांनी त्याला 10 हजारांचे बक्षिसही दिल्याची माहिती मिळत आहे.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliceपोलिस