शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:22 IST

नव्या शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषीय फॉर्मूल्यासंदर्भात बोलताना कमल म्हणाले, "ते हिंदिया बनवत आहेत. केंद्राकडून घेण्यात येणारा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या बाजूने असणार नाही. हा निर्णय संघराज्याच्या तत्वांविरुद्ध आहे आणि अनावश्यक आहे.

सध्या भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील राजकारण शिगेला पोहोचले आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप तामिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांवर हिंदी लादत असल्याचा आरोप अभिनेता कमल हासन यांनी केला आहे. याशिवाय, त्यांनी मतदारसंघांच्या पुरनर्रचनेवरही भाष्य केले. तसेच, केंद्र सरकारवर हल्ला चढवत, ते 'हिंदिया' (HINDIA) करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कमल हसन यांनी केला आहे.

मक्कल निधी मैयमचे (एमएनएम) अध्यक्ष कमल हासन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अशा प्रकराचा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांसाठी हिताचा नाही. नव्या शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषीय फॉर्मूल्यासंदर्भात बोलताना कमल म्हणाले, "ते हिंदिया बनवत आहेत. केंद्राकडून घेण्यात येणारा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या बाजूने असणार नाही. हा निर्णय संघराज्याच्या तत्वांविरुद्ध आहे आणि अनावश्यक आहे.

मतदारंसघाच्या पुनर्रचनेसंदर्भात काय म्हणाले कमल हासन? -प्रस्तावित सीमांकनासंदर्भात (मतदारंसघाच्या पुनर्रचनेसंदर्भात) बोलताना हसन म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या बदलण्याची गरज नाही. ते न तुटलेल्य वस्तूची दुरुस्त कशासाठी करत आहेत? ते लोकशाहीला दुरुस्तीसाठी कार्यशाळेत का पाठवत आहेत?" खरे तर, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या द्रमुकला लोकसंख्येच्या आधारावर सीमांकनामुळे राज्यांचे संसदेतील संख्याबळ कमी होईल, त्यांच्या जागा कमी होतील, अशी चिंता सतावत आहे. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनTamilnaduतामिळनाडूhindiहिंदी