शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात चोरीचा संशय; 20 किमी पाठलाग करत जमावाचा कुटुंबावर हल्ला, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:25 IST

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुदुकोट्टई:तामिळनाडूतील पुदुकोट्टई गावात मंदिरात चोरीच्या संशयावरून एका कुटुंबावर जमावाने हल्ला केला. ऑटोतून जात असलेल्या या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात करपगंबिका नावाच्या 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घटना 14 नोव्हेंबरची आहे, मात्र त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हिडिओमध्ये जमाव कुटुंबातील सहा सदस्यांवर हल्ला करताना दिसत आहे. कुटुंबासोबतच 10 वर्षीय करपगंबिका हिलाही दुखापत झाली आहे. जखमींना पुदुकोट्टई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कर्पागंबिकाचे निधन झाले. या कुटुंबाकडून मंदिरातील साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जमावाने कुटुंबाचा 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केलासविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूच्या पुदुकोट्टई जिल्ह्यातील किलनूर टाउनशिपजवळ एक गट धार्मिक स्थळांना लुटत असल्याची बातमी पसरली. व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून गर्दी जमवली. यानंतर ऑटोमध्ये बसून गावाबाहेर पडलेल्या लोकांना चोर समजून गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. 20 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर लोकांनी ऑटो थांबवला. यानंतर आत बसलेल्या लोकांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, मात्र तोपर्यंत पोलिस पोहोचले.

मुलीची आई म्हणाली - ते मंदिरात दर्शनासाठी गेले होतेयाप्रकरणी मुलीची आई लिली पुष्पा यांनी गणेश नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने सांगितले की, त्यांचे कुटुंब दोन महिन्यांपूर्वी अनेक मंदिरांना भेट देण्यासाठी ऑटोरिक्षाने कुड्डालोरहून निघाले होते. 14 नोव्हेंबर रोजी किलनूरजवळ त्याचे तीन जणांशी भांडण झाले, यानंतर जमावाने हल्ला केला. दरम्यान, पोलिसांनी या कुटुंबाकडून घंटा आणि इतर पितळी साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारी