शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांची कोरोनावर मात, पण स्वागतावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 11:13 IST

तामिळनाडू सरकारमधील मंत्री सेल्लुर राजू यांना कोरोनाची लागण झाली होती. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तामिळनाडू सरकारने राज्यात लागू असलेला लॉकडाऊन कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

मदुराई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तर तामिळनाडूमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तामिळनाडू सरकारमधील मंत्री सेल्लुर राजू यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता तो पूर्णपणे बरे असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुरुवारी ते मदुराईला परतले. मात्र, कोरोनामुक्त झाल्यामुळे AIADMK च्या कार्यकर्त्यांनी सेल्लुर राजू यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविण्यात आला.

वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, शेकडो कार्यकर्त्यांनी सेल्लुर राजू यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी सेल्लूर राजू हे आपल्या गाडीत बसून हात जोडून कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत. अनेक पोलीस सुद्धा तेथे दिसतात. मात्र, त्यांच्या स्वागतादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तामिळनाडू सरकारने राज्यात लागू असलेला लॉकडाऊन कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये आणखी सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये खासगी आस्थापनांच्या कार्यालयात आणखी कर्मचार्‍यांना येण्याची आणि हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

जुलै महिन्यात सर्व रविवारी लागू असलेला संपूर्ण लॉकडाऊन वाढवून ऑगस्टपर्यंत वाढवताना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी म्हणाले की, 2, 9, 16, 23 आणि 30 ऑगस्टला कडक नियम लागू असतील. तसेच, सोशल डिस्ंटसिंग आणि मास्क वापरण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन राज्यात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक वाहतूक, शॉपिंग मॉल्स, थिएटर, बार आणि सर्व प्रकारच्या राजकीय व क्रीडाविषयक उपक्रमांवर निर्बंध कायम राहतील, असे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडू