शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना पाहून जंगलात पळायचा, १३ मुलांचा बाप नसबंदीसाठी असा तयार झाला; वाचा रंजक कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:35 IST

एकाबाजूला देशात 'हम दो, हमारे दो' यासाठीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे तामिळनाडूच्या इरोडमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे.

इरोड-

एकाबाजूला देशात 'हम दो, हमारे दो' यासाठीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे तामिळनाडूच्या इरोडमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. जिथं एक व्यक्ती १३ मुलांचा बाप झाल्यानंतर अखेर नसबंदी करण्यासाठी तयार झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ४६ वर्षीय व्यक्तीची समजूत काढण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांपासून ते अगदी पोलिसांनी देखील जंगजंग पछाडले. तेव्हा कुठं जाऊन चिन्ना मथैयन नावाचा १३ मुलांचा बाप नसबंदीसाठी तयार झाला. गेल्याच आठवड्यात चिन्ना याची पत्नी शांती हिनं १३ व्या मुलाला जन्म दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा-जेव्हा आरोग्य विभागाची टीम मथैयन यांची समजूत घालण्यासाठी पोहोचायची. तो जंगलात पळून जायचा. त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं.

नसबंदीला धार्मिकदृष्ट्या चुकीचं मानायचाइरोड जिल्ह्यातील अंधियुर जवळील गावातील असलेल्या या जोडप्यानं धार्मिकदृष्ट्या नसबंदी स्वीकारली नाही. या जोडप्यानं गेल्या काही वर्षांत कुटुंब नियोजन पूर्णपणे नाकारलं आहे. या जोडप्याला सात मुलं आणि पाच मुलींसह १२ अपत्य आहेत. शांती यांनी बुधवारीच एका मुलाला जन्म दिला. ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. के शक्ती कृष्णन म्हणाले की, स्थानिक पोलिस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने चार दिवसांच्या समुपदेशनानंतर मथैयन यांना पुरुष नसबंदी करण्यासाठी मन वळवण्यासाठी सतत प्रयत्न केले. 

आरोग्य पथक पोहोचल्यावर जंगलात पळायचाशक्ती कृष्णन म्हणाले, "नसबंदी प्रक्रियेसाठी रुग्णालयात नेण्यापूर्वी आम्ही जोडप्याच्या कुटुंबाला पाच दिवसांचे किराणा सामानंही दिले होते" नुकत्याच झालेल्या प्रसूतीनंतर शांतीची शारीरिक स्थिती कमकुवत झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर तिनं दुसर्‍या मुलाला जन्म दिला तर तिचा मृत्यू होईल. त्यामुळेच आम्ही मथैयनवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मथैयन यांची समजूत घालण्यासाठी टीमने आठ वेळा त्यांच्या गावाला भेट दिली. यादरम्यान, जेव्हा जेव्हा वैद्यकीय पथक समुपदेशनासाठी त्याच्या गावी जायचे तेव्हा मथैयन अंधीयुर येथील राखीव जंगलात गायब व्हायचे.

पत्नीची प्रकृती बिघडल्यानंतर घेतला निर्णयपत्नीच्या खराब प्रकृतीबद्दल समजावून सांगितल्यानंतर मथैयननं शेवटी नसबंदी करण्यास सहमती दर्शविली. रविवारी सकाळी मथैयन यांची अंधियूर येथील सरकारी रुग्णालयात नसबंदी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. ऑपरेशनच्याच दिवशी त्याला रात्री घरी सोडण्यात आलं.