शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वाढता धोका ओळखून 'हे' मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; लोकांना वाटले मास्क, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 12:08 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. 50 हजारांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली असून धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी (5 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 58,097 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 534 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. 

कोरोनाचा वाढता धोका पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM Stalin) हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. स्टॅलिन यांनी जनजागृती करत लोकांना मास्क वाटले. तसेच लोकांना खबरदारी घेण्याच्या आणि मास्क घालण्याच्या सूचना देखील दिल्या. मुख्यमंत्री मंगळवारी मास्कचे वाटप करण्यासाठी त्यांच्या गाडीमधून खाली उतरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मास्कचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी विशेषत: त्यांचा ताफा अशा ठिकाणी थांबवला जिथे लोक त्यांना मास्कशिवाय दिसत होते. मुख्यमंत्री जात असताना त्यांना रस्त्यात मास्क न घातलेले लोक दिसले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या धोक्याबाबत दिला इशारा 

लोकांना मास्कचे वाटप करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोरोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यमही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वाहन थांबवून मुले व महिलांना मास्कचे वाटप केले. मास्कचे वाटप केल्यानंतर ते लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघाले. सोमवारी चेन्नईमध्ये करोनाच्या 1728 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यानंतर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या तामिळनाडूत 10,364 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 36,796 वर

चेन्नईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,259 झाली आहे. तसेच अनेक दिवसांनंतर, कोईम्बतूरमध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे आणि नवीन रुग्णांची संख्या 105 वर पोहोचली आहे. तिरुपूरमध्ये 52, तर कन्याकुमारीमध्ये 47 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 27,52,856 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, संसर्गामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 36,796 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूOmicron Variantओमायक्रॉन