शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून धोनीचे तोंडभरून कौतुक; IPL मधून निवृत्त न होण्याची केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 10:17 IST

mk stalin ms dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जगभरात चाहतावर्ग आहे.

mk stalin dhoni | नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जगभरात चाहतावर्ग आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याचे स्थान अद्याप तसेच आहे. धोनीच्या चाहत्यांमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा देखील समावेश आहे. एका कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन यांनी धोनीचे तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी धोनीचे कौतुक करताना आयपीएलमधून निवृत्त न होण्याची विनंती केली. 

मी धोनीचा मोठा चाहता - स्टॅलिनतामिळनाडू चॅम्पियन्स फाउंडेशन आणि मुख्यमंत्री ट्रॉफीचा लोगो लॉन्च करताना स्टॅलिन यांनी म्हटले, "सगळ्यांसारखा मी देखील महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे. मला आशा आहे की, तामिळनाडूचा हा 'दत्तक' सुपत्र चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणे सुरूच ठेवेल. तो भारतातील लाखो युवकांसाठी एक प्रेरणा आहे."

तामिळनाडूत अनेक धोनी तयार व्हावेत - स्टॅलिनमुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी धोनीचे कौतुक करताना राज्यातील खेळाडूंचा उत्साह वाढवला. "महेंद्रसिंग धोनी भारतातील लाखो युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आम्हाला तामिळनाडूतून केवळ क्रिकेटमधूनच नाहीतर इतर खेळांमधून देखील अनेक धोनी तयार करायचे आहेत." खरं तर धोनी ४१व्या वर्षी देखील आयपीएल खेळत आहे. 

"धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी ३ वेळा ट्रॉफी जिंकली असती", वसिम अक्रमचं अजब विधान

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी घौडदौडआयपीएलच्या सोळाव्या हंगामात देखील धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या संघाला ४ सामने गमवावे लागले आहेत. १३ गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज आताच्या घडीला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीIPLआयपीएल २०२३Chennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्स