शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:54 IST

Tamil Nadu Assembly Election 2021: द्रमुक उमेदवारांचे मोदींना आव्हान; उपहासात्मक आव्हानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

चेन्नई : तमिळनाडूमध्ये द्रमूक आणि अण्णाद्रमुक पक्षांमध्ये खरी लढत असली तरी पंतप्रधान मोदी यांना विरोधात प्रचारसभा घेण्याचे आव्हान द्रमुक उमेदवारांकडून दिले जात आहे. उपहासात्मक पद्धतीने दिलेल्या या आव्हानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजप किंवा अण्णाद्रमुकच्या उमेदवारांचा प्रचार करावा, जेणेकरून आमच्या मताधिक्यात वाढ होईल, असा टोमणा पंतप्रधानांना ट्विटरवर टॅग करून काही उमेदवारांनी मारला आहे.कुमबुम विधानसभा मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार एन. रामकृष्णा ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तुम्ही कुम्बुम विधानसभेत प्रचार करा, मी येथे द्रमुकचा उमेदवार आहे. तुमच्या प्रचारामुळे माझे मताधिक्य वाढण्यास मदत होईल, असे आव्हान त्यांनी दिले आहे. पंतप्रधानांना आपल्या विरोधात प्रचार करण्याचे खुले आव्हान देऊन एन. रामकृष्णा यांनी सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे. त्यांच्या या हटके स्टाईलनंतर द्रमुक नेत्यांनी देखील असे टि्वट केले आहेत. पाच टर्म आमदार असलेल्या ई.व्ही. वेलू यांनी थिरूवन्नमलाई मतदारसंघात आपल्या विरोधकाचा प्रचार करण्याचे आव्हान मोदी यांना दिले. वेलू यांच्यासाठी घरावर आयकर विभागाने छापे मारले होते. सेव्वाराज के. थडंगम पी सुब्रमणी, अनिथा राधाकृष्णन, अंबेथकुमार या द्रमुक नेत्यांनी देखील टि्वटरवर असे आव्हान दिले आहे.पंतप्रधानांविरोधात नाराजीतमिळनाडूमध्ये सध्या पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी दिसते. जल्लीकट्टू, नीट, तमिळी अस्मिता, हिंदीचे उद्दातीकरण अशा प्रकरणामुळे तमिळी जनतेत केंद्र सरकारबाबत नाराजी आहे. तमिळी, द्रविडी परंपरावर भाजप आक्रमण करत असल्याचा आरोप द्रमुक करत आहे. राज्यातील अण्णाद्रमुक हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुले असून, त्यांच्या माध्यमातून केंद्र आपली मर्जी चालवत असल्याचे द्रमुक मतदारांना सांगत आहे. यातून पंतप्रधानांनी आपल्याविरोधात प्रचार केल्यास त्याचा आपल्याला फायदा होईल, असे द्रमुक नेत्यांना वाटते.

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम