शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तामिळ ‘मरसेल’ चित्रपटाने भाजपा नेते प्रचंड अस्वस्थ; संवाद वगळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 07:22 IST

जीएसटी, नोटाबंदी व डिजिटल इंडिया यांच्यावर विनोदी भाष्य करणा-या ‘मरसेल’ या चित्रपटाने भाजपा नेते व कार्यकर्ते भलतेच अस्वस्थ झाले असून, या विषयांवरील संवाद चित्रपटांतून काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.

चेन्नई : जीएसटी, नोटाबंदी व डिजिटल इंडिया यांच्यावर विनोदी भाष्य करणा-या ‘मरसेल’ या चित्रपटाने भाजपा नेते व कार्यकर्ते भलतेच अस्वस्थ झाले असून, या विषयांवरील संवाद चित्रपटांतून काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे. हा वाद वाढू नये, म्हणून काही संवाद वगळावेत का, असा विचार निर्माते करीत आहेत.ऐन दिवाळीत, १८ आॅक्टोबर रोजी संपूर्ण तामिळनाडू, मुंबई तसेच अमेरिका, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर व अन्य देशांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रजनीकांतच्या कबाली या चित्रपटाचे तसेच आमीर खानचा दंगल व शाहरूख खानचा रईस या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी या चित्रपटाचे समर्थन करून निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या चित्रपटावरून पंतप्रधान मोदी यांना टोमणा मारला आहे, तर माजी मंत्री पी. चिदम्बरम यांनी केवळ भाजपा सरकारची प्रशंसा केलेल्या चित्रपटांनाच परवानगी देणार की काय, असा खोचक सवाल विचारला आहे. कमल हसन यांनी ‘मरसेल’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे. त्याला पुन्हा सेन्सॉर करू नका. टीकेला संयुक्तिक उत्तर द्या. टीकाकारांची मुस्कटदाबी करू नका. भारत बोलला तरच चमकेल. कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम’ चित्रपटास विरोध झाला होता, तेव्हा त्यांनी देश सोडण्याची धमकी दिली होती.‘मरसेल’मध्ये मुख्य भूमिका विजय यांची आहे. ते ख्रिश्चन असल्याने भाजपाने चित्रपटावर टीका करताना, त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री पोण्ण राधाकृष्णन यांनी चित्रपटाला विरोध करताना विजय यांच्या धर्मावरही तोंडसुख घेतले. जीएसटीची खोटी माहिती देणारा प्रसंग चित्रपटातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरे एक भाजपा नेते एच. राजा यांनी म्हटले की, अभिनेते विजय यांचा मोदीविरोध यानिमित्ताने समोर आला आहे. प्रख्यात तामिळ दिग्दर्शक पी. ए. रणजीत यांनीही ‘मरसेल’च्या निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपाची टीका म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे, अशी टीका माकपाने केली आहे. >वादग्रस्त संवादतुम्ही मला लुटू नका. नोटाबंदीमुळे माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. इथे २८ टक्के जीएसटी असूनही आरोग्यसेवा मिळत नाही. सिंगापूरमध्ये ७% जीएसटी असूनही मोफत आरोग्यसेवा मिळते. इथे औषधांवर १२ टक्के जीएसटी आहे. पण दारूवर मात्र जीएसटी नाही.>पी. चिदंबरम यांचा हल्लाबोलपी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, भाजपाला सरकारची प्रशंसा करणा-या चित्रपटांनाच परवानगी दिली जावी, असे वाटत असावे. तसा कायदा लवकरच बनवला जाईल, असे दिसते. आज जर ‘परशक्ती’ प्रदर्शित झाला असता तर काय झाले असते याची कल्पना करा.>परशक्तीविषयीशिवाजी गणेशन यांची भूमिका असलेला परशक्ती चित्रपट १७ आॅक्टोबर १९५२ साली प्रदर्शित झाला. त्यात ब्राह्मण व हिंदू यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती. त्या चित्रपटाची पटकथा व संवाद एम. करुणानिधी यांनी लिहिले होते. तो चित्रपटही दिवाळीतच प्रदर्शित झाला होता.>राहुल गांधी यांचा मोदी यांना टोमणाराहुल यांनी मोदी यांना टोमणा मारला आहे. त्यांनी म्हटले की, श्रीमान मोदी, हा चित्रपट तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मरसेलमध्ये हस्तक्षेप करून तामिळ सन्मानाचे राक्षसीकरण करू नका.’ राहुल यांनी टिष्ट्वटमध्ये ‘राक्षसीकरण’ यासाठी ‘डेमोन-टाइज’ अशी इंग्रजी शब्दरचना केली आहे. ‘डेमोने-टाइज’ म्हणजे ‘नोटाबंदी करणे’ होय.

टॅग्स :BJPभाजपा